केंद्र सरकारच्या पीएमई योजनेअंतर्गत नाशिक शहराला पुढच्या काही दिवसात पन्नास इलेक्ट्रिक बसेस मिळणार आहे. त्यासाठी मनपाने आडगाव येथे बसडेपो बांधणार आहे.पण भविष्यात आणखी पन्नाा इलेक्ट्रिक बस मनपाच्या ताब्यात समाविष्ट होऊ शकतात. ते पाहता आडगाव येथे २७ कोटी रुपये खर्च करुन सव्वाशे बस डेपो बांधण्याचा प्रस्ताव केद्रांच्या पथकासमोर ठेवला आहे. हा खर्च ‘एन कॅप’ निधीतून केला जाणार आहे. महापालिका अधिकाऱि व केंद्रिय पथकाची बुधवारी (दि.२१) ऑनलाइन बैठक झाली.
इलेक्ट्रिक बसेससाठी आडगांव येथील ट्रक टर्मिनलच्या जागेवर बस डेपोची व्यवस्था केली जाणार आहे. यापूर्वी शहरात केद्रांच्या पथकाने आडगांवला जाउन प्रत्यक्ष डेपोची पाहणी केली. तसेच बसेस चार्जिंगसाठी सबस्टेशनची आवश्यकता असल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. चौदा कोटीचा खर्च सब स्टेशनसाठी येणार असून हा निधी केद्राकडून मिळ्णार आहे. या ठिकाणी पन्नास बस रोज चार्जिंग होतील ऐवढा वीज पुरवठा सबस्टेशनद्वारे होणार आहे. केंद्र सरकार बससेवा सुरु झाल्यानंतर पुढिल दहावर्षासाठी एका बससाठी प्रतिकिलोमीटर २४रुपये अनुदान मिळणार आहे. सध्या मनपाकडून सिटिलिंक बससेवा सुरु असून त्यासाठी ठेकेदार मनपाने नेमला आहे. मात्र ज्या पन्नास ई बसेस शहरासाठी येतील, त्यांच्यासाठी केंद्र सरकार एजन्सी नेमेल व त्याच्याकडून शहरात बससेवा कार्यन्वित करणार आहे. सबस्टेशन उभारणे, दर महिन्याचे चार्जिंगचे बील हे एजन्सीकडून दिले जाईल. आडगांव येथील महापालिकेच्या साडे चार एकारावर सव्वासशे बसेससाठी डेपो साकारला जाणार आहे.
भविष्याचा विचार करता पन्नास एवजी सव्वाशे बस संख्येचा डेपो व्हावा असा, प्रस्ताव केद्राकडे ठेवण्यात आला आहे. पन्नास बसेसाठी डेपो उभारला नंतर पुढच्या काही वर्षात पुन्हा बसेसची संख्या वाढली तर पुन्हा नव्याने डेपो बांधावा लागण्याची शक्यता आहे. म्हणूनच आताच सव्वाशे बस डेपो बांधल्यास तो उपयोगाचा ठरणार आहे.
-बाजीराव माळी, कार्यकारी अभियंता यांत्रिकी विभाग, मनपा