27 C
Mumbai
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक शहर व परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश :अविनाश...

नाशिक शहर व परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश :अविनाश शिंदे

नाशिक महानगरात वंचित बहुजन आघाडीचे प्राबल्य दिवसेंदिवस वाढत आहे.पक्षाचे सर्वेसर्वा डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या विचाराने प्रभावित होऊन अनेक संघटनांनी वंचित मध्ये विलीन करून घेत शहरामध्ये विविध ठिकाणी 11 शाखेचे उद्घाटन करण्यात आले आहे नाशिक लोकसभा व विधानसभा भागातील शेकडो कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष पवन पवार महानगराध्यक्ष अविनाश शिंदे उपमा नगर प्रमुख सुनील साळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. प्रवेश करणाऱ्यांमध्ये संदिप खडसे, राजू बच्छाव अनिल इंगोले,संदिप इंगोले अमोल ठोक,वीकी गई,प्रविण ढाब,अनिल दाणी,विकी सोनव‌णे खंडू मकासरे,राहुल जम‌धडे, प्रशांत मोरे,अमजात पठान सुनील पाटने,विशाल होखाळे अतुल जाधत,प्रफुल्ल समाने,धाम संखकार,टॅन लिब्यलो,भिमनात चरक,बाबूराव दातार, विष्याम सावंत,मंदेह दोदे,भारत गायकवाड,प्रम्हानंद मोरे समावेश आहे.

नाशिक महानगरात वंचित बहुजन आघाडीचे प्राबल्य दिवसेंदिवस वाढत आहे.पक्षाचे सर्वेसर्वा डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या विचाराने प्रभावित होऊन अनेक संघटनांनी वंचित मध्ये विलीन करून घेत शहरामध्ये विविध ठिकाणी 11 शाखेचे उद्घाटन करण्यात आले आहे नाशिक लोकसभा व विधानसभा भागातील शेकडो कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष पवन पवार महानगराध्यक्ष अविनाश शिंदे उपमा नगर प्रमुख सुनील साळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. प्रवेश करणाऱ्यांमध्ये संदिप खडसे, राजू बच्छाव अनिल इंगोले,संदिप इंगोले अमोल ठोक,वीकी गई,प्रविण ढाब,अनिल दाणी,विकी सोनव‌णे खंडू मकासरे,राहुल जम‌धडे, प्रशांत मोरे,अमजात पठान सुनील पाटने,विशाल होखाळे
अतुल जाधत,प्रफुल्ल समाने,धाम संखकार,टॅन लिब्यलो,भिमनात चरक,बाबूराव दातार, विष्याम सावंत,मंदेह दोदे,भारत गायकवाड,प्रम्हानंद मोरे समावेश आहे.

वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करणाऱ्यांचा योग्य तो आदर मिळाला जाईल आणि त्याच्यावर योग्य ती जबाबदारी सोपविली जाईल,असे महानगराध्यक्ष अविनाश शिंदे यांनी सांगितले.लोकसभा,आगामी विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची भूमिका करिष्मा करून दाखवेल,असा विश्वासही शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

जिल्हाध्यक्ष पवन पवार यांनी सदर प्रसंगी बोलताना सांगितले की,नाशिक जिल्हा हा वंचित बहुजन आघाडीचा बालेकिल्ला असून भावी खासदार हा वंचित बहुजन आघाडीचा असेल.
प्रदीप खडसे यांनी आपले मत व्यक्त केले देवळाली मतदारसंघात हा अनुसूचित जातीसाठी राखीव असून आत्तापर्यंत तेथे काम करण्यास वाव नव्हता.पण आता वंचित बहुजन आघाडीच्या स्वरूपाने मोठ्या प्रमाणात काम उभं करून वंचित बहुजन आघाडीचा आमदार शंभर टक्के निवडून आणण्यास मदत करणार.
विवेक तांबे यांनी पश्चिमची धुरा स्वीकारून एक प्रकारे नवीन चॅलेंज स्वीकारले आहे. जिल्हाध्यक्ष पवन पवार यांनी खासदारकीची निवडणूक पुन्हा लढवावी असे साकडे अविनाश शिंदे आणि कार्यकर्त्यांनी त्यांना घातले. यावेळी पक्षश्रेष्ठी तो निर्णय घेतील जो आपल्याला मान्य राहील,असे पवन पवार यांनी स्पष्ट केले. प्रसंगी उत्तर महाराष्ट्र महासचिव वामनदादा गायकवाड संजय साबळे बजरंग शिंदे संदीप काकळीच महेश भोसले तुकाराम मोझाड सुरज गांगुर्डे उत्तम साळवे विनोद दोंदे दामोदर पगारे विकी साळवे बाबा सावंत आधी पदाधिकारी उपस्थित होते

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी