33 C
Mumbai
Monday, April 22, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक जिल्ह्यात औद्योगिक बंद करून औद्योगिक कामगारांचा जिल्हाधिकारी कचेरीवर विराट मोर्चा

नाशिक जिल्ह्यात औद्योगिक बंद करून औद्योगिक कामगारांचा जिल्हाधिकारी कचेरीवर विराट मोर्चा

आज औद्योगिक कामगारांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे साडेपाच हजार उद्योगांपैकी बहुतेक सर्व उद्योगांमध्ये ७०% टक्के पेक्षा जास्त कंत्राटी कामगार काम करत आहेत. हंगामी, टेम्पररी, ट्रेनी अप्रेंटिस च्या नावाखाली तरुणांचे शोषण सुरू आहे. वर्षानुवर्षे काम केले तरी त्यांना कायम केले जात नाही. किमान वेतनही दिले जात नाही. राजरोसपणे किमान वेतनाची चोरी केली जाते, सामाजिक सुरक्षाचे धिंडवडे निघाले आहेत, अपघात होवून अपंगत्व आल्यास भरपाई देत नाही. गुलामगिरीच्या अवस्थेत कामगार वर्गाला काम करावे लागत आहे.किती वर्ष अल्प वेतनावर काम करणार, किती वर्ष कंत्राटी हंगामी पद्धतीने राबणार, आयुष्यभर कष्ट केल्यानंतर म्हातारपणाचे पेन्शनचे काय? किती वर्ष भाड्याच्या घरामध्ये राहणार? हे प्रश्न आता कामगारांसमोर आहेत. आम्हीही गुलामगिरी सहन करणार नाही.

आज औद्योगिक कामगारांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे साडेपाच हजार उद्योगांपैकी बहुतेक सर्व उद्योगांमध्ये ७०% टक्के पेक्षा जास्त कंत्राटी कामगार काम करत आहेत. हंगामी, टेम्पररी, ट्रेनी अप्रेंटिस च्या नावाखाली तरुणांचे शोषण सुरू आहे. वर्षानुवर्षे काम केले तरी त्यांना कायम केले जात नाही. किमान वेतनही दिले जात नाही. राजरोसपणे किमान वेतनाची चोरी केली जाते, सामाजिक सुरक्षाचे धिंडवडे निघाले आहेत, अपघात होवून अपंगत्व आल्यास भरपाई देत नाही. गुलामगिरीच्या अवस्थेत कामगार वर्गाला काम करावे लागत आहे.किती वर्ष अल्प वेतनावर काम करणार, किती वर्ष कंत्राटी हंगामी पद्धतीने राबणार, आयुष्यभर कष्ट केल्यानंतर म्हातारपणाचे पेन्शनचे काय? किती वर्ष भाड्याच्या घरामध्ये राहणार? हे प्रश्न आता कामगारांसमोर आहेत. आम्हीही गुलामगिरी सहन करणार नाही.आम्हाला कायम नोकरी पाहिजे, किमान २६ हजार रुपये किमान वेतन मिळाले पाहिजे, लाभ मिळाळे पाहिजे, म्हातारपणाच्या पेन्शनची व्यवस्था झाली पाहिजे, मोफत घर बांधून मिळाले पाहिजे, मोफत शिक्षण आणि आरोग्याची सोय केली पाहिजे, कामगार विरोधी ४ लेबर कोड रद्द केले पाहिजे, न्याय मागण्यासाठी युनियन केल्यास कामावरून कमी केले जाते. उद्योग बंद करतात पण कामगार प्रा.फंड, ग्र्याच्युईटीची रक्कम देत नाहीत. महिला कामगारांची अधिकच पिळवणूक करण्यात येत आहे.
स्थानिक मागण्या :-
१) मे. अनिल प्रिंटर्स, मे.श्याम इलेक्ट्रोमेक, अंबड औद्योगिक वसाहतीतील या कंपनीतील कामगारांना मागील वेतनासह पूर्ववत कामावर रुजू करून घ्यावे असे मा.कामगार न्यायालय, नाशिक यांनी आदेश केले आहे. मात्र अद्याप या कामगारांना कामावर रुजू करून घेतले नाही व त्यांचे कायदेशीर देणी देखील दिलेली नाहीत.
२) मे.ऑटोफिट व मे.क्राऊन क्लोझर, मे.सिमेघ, सातपूर औद्योगिक वसाहत या कंपनी व्यवस्थापनाने कोणतीही पूर्वसूचना न देता व कामगारांच्या कायदेशीर देणी न देता कंपनी बंद केली आहे. या कामगारांना अद्याप पावेतो त्यांची देणी मिळालेल्या नाही.
३) मे.एम.जी. इंडस्ट्रीज, सातपूर, नाशिक कंपनी व्यवस्थापनाने मागील दोन वर्षापासून कंपनीचे उत्पादन बंद केले. कामगारांचे वेतन, ग्र्याच्युईटी, प्रा.फंडासह इतर देणी आज पावतो बाकी आहे. सदर कंपनीची मालमत्ता जप्ती झाल्यास कामगारांची येणे असलेली रक्कम मिळू शकणार नाही.
४) मे.सागर इंजीनियरिंग,W-67/A,औद्योगिक वसाहत सातपूर, नाशिक कंपनी व्यवस्थापनाने मागील दोन वर्षापासून कंपनीचे उत्पादन बंद केले. प्रा.फंडाची रक्कम रु.१९,९४,०४०/- इतकी बाकी आहे. कामगारांची देय रक्कम वसुलीबाबत मा. जिल्हाधिकारी, नाशिक, मा. आयुक्त, भविष्य निर्वाह निधी, कार्यालय, नाशिक, यांना देखील दि.२५/०८/२०२३ रोजी पत्र दिले आहे व त्यामुळे कामगारांची थकीत रक्कम कामगारांना मिळणे आवश्यक आहे.
५) मे.नाशिक फोर्ज,अंबड हि कंपनी व्यवस्थापनाने बेकायदेशीररीत्या बंद केली आहे. कामगारांचे थकीत वेतन, ग्र्याच्युईटी, नुकसान भरपाई,इत्यादी देणी अदा करण्यात यावे.या बाबतचे मा. कामगार उपायुक्त कार्यालय, नाशिक यांनी वसुलीचे प्रमाणपत्र जरी केली आहे. परंतु अद्याप या कामगारांना त्यांची देणी मिळालेले नाही.
६) मे.प्रीमियम टूल्स, सातपूर या कंपनीतील कामगारांची कायदेशीर देणी त्वरित आदा करण्याबाबत मा. कामगार उपायुक्त कार्यालय, नाशिक यांनी वसुलीचे प्रमाणपत्र जारी केली आहे. परंतु अद्याप या कामगारांना त्यांचे देणी मिळालेले नाही.
७) मे.हिंदुस्तान नॅशनल ग्लास अँड इंडस्ट्रीज लि (एचएनजी) औद्योगिक वसाहत माळेगांव,सिन्नर या कंपनीतील कायम कामगारांना कामावर घ्यावे असा आदेश मा.कामगार उपायुक्त कार्यालयाने दिला असून व्यवस्थापनाने अद्याप कामगारांना कामावर घेतलेले नाही.
८) मे.डायनामिक प्रेस्टीज, मे. नॅश ग्रुप, मे.आशा मल्टीलेव्हल कार पार्किंग,अंबड या कंपनीतील कामगारांचे प्रलंबित प्रश्नाबाबत युनियनशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावा, तसेच कमी केलेल्या कामगारांना कंपनीने पुर्ववत कामावर घ्या.
९) मे. हायमिडिया लेबोरेटरीज प्रा. लि. दिंडोरी, मे.फॅब इंडस्ट्रीज, वाडीवऱ्हे व मे. वंदना डीस्टलरीज या कंपनीतील कंत्राटी कामगारांनी युनियन केली म्हणून कामावरून काढून टाकले. त्या कामगारांना पुर्ववत कामावर रुजू करून घेतलेले नाही.
१०) मे.वीर इलेक्ट्रो इंजिनियरिंग या कंपनीतील कामगारांचे थकीत वेतन अद्याप मिळालेले नाही.
११) मे.केटाफार्मा, औद्योगिक वसाहत,मुसळगांव सिन्नर या कंपनीतील कामगारांनी संप मागे घेतला
परंतु व्यवस्थापनाने कामगारांना अद्याप कामावर हजर केलेले नाही.
१२) नवीन नाशिक, सिन्नर मालेगांव व मुस्ल्गांव साठी २, दिंडोरी, घोटी गोंडे मालेगांव पिंपळगाव वासावंत, चांदवड येथे ई.एस.आय.सी हॉस्पिटल सुरु करण्यात यावी.
१३) सर्व कामगार कायदे पुन्हा स्थपीत करून त्याची कठोर अंमलबजावणी करा.

हे आमचे प्रश्न आहेत. व यासाठी आम्ही एकजुटीने संघर्ष करण्याचा निर्णय घेतला आहे. व यासाठी १६ फेब्रुवारी रोजी आम्ही औद्योगिक बंद करून नाशिकच्या मा. जिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालयावर विराट संख्येने जमून गुलामगिरीच्या विरोधातला आवाज बुलंद करणार आहोत.
आपण सर्वांनी या कामगार वर्गाच्या गुलामगिरीला आव्हान देणाऱ्या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन करीत आहोत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी