33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रगाडगे महाराज पुलावर संरक्षक पाईप बसवा; मनपा आयुक्तांना निवेदन

गाडगे महाराज पुलावर संरक्षक पाईप बसवा; मनपा आयुक्तांना निवेदन

शहरात येत्या काही दिवसात रथोत्सव होणार आहे . त्यामुळे गाडगे महाराज पूल < gadge maharaj bridge > ते गणेशवाडी रोड येथे मोठी गर्दी होते. गोदघाटावरील गाडगे महाराज पुलावरून रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांसोबत लहान मुले देखील असतात, यात्रा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. मात्र गाडगे महाराज पुल व अहिल्यादेवी होळकर पुलावर अनेक वाहन धारकांकडून वाहनं बेशिस्तपने पार्किंग करण्यात येतात . यासंदर्भात नाशिक शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात बेशिस्तपने पार्किंग मुळे रस्ता आणखी अरुंद होतो, त्यामुळे नागरिकांना रस्त्याने जाताना खूप कसरत करावी लागते.(install a protective pipe on gadge maharaj bridge; Memorandum to the Municipal Commissioner )

दिल्ली दरवाजा, कानडे मारुती लेन, दहिपूल, वीर सावरकर पथ भाग काही वर्षांपासून ‘बिझनेस हब’ बनला आहे. परंतु दुकानांसमोर वाहने उभी करण्यासाठी जागा नसल्याने व्यावसायिक आपली वाहने बिनदिक्कत गाडगे महाराज पुलावर उभी करतात. त्यामुळे पुलाची वाहतूक क्षमता निम्म्‍यावर आली आहे. उर्वरित निम्म्या जागेतूनच उर्वरित वाहनांसह
पायी चालणाऱ्यांना मार्गक्रमण करावे लागते. आडगाव नाक्याकडे जाण्यासाठी हा जवळचा मार्ग असल्याने आधीच वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यात आता पुलावरील पार्किंगमुळे वाहनधारकांसह पायी चालणाऱ्यांना जीव मुठीत धरून चालावे लागते. मध्यंतरी व्हिक्टोरिया पुलावर मोठ्या प्रमाणावर वाहने पार्क केली जात होती, परंतु पोलिस
प्रशासनाने विरोध केल्याने पार्किंगला काही अटकाव बसला आहे, परंतु पोलिस प्रशासन गाडगे महाराज पुलाकडे लक्ष द्यायला तयार नसल्याने वाहनधारकांचे फावते आहे परंतु पुलावर उभी केलेली वाहने रात्री उशिरापर्यंत थांबून असल्याने व दुसऱ्या बाजूने भरधाव वाहने जात असल्याने पायी चालणाऱ्यांना जीव मुठीत धरूनच चालावे लागते. वाहनांच्या पार्किंगमुळे आधीच निम्म्या झालेल्या पुलावरून उर्वरित वाहतूक सुरू असते. महापालिकेच्या उत्पन्नावर संक्रांत गोदाघाटाच्या दुतर्फा महापालिकेकडून वाहनांच्या पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वाहनाधारकांकडून ठराविक पार्किंग शुल्कही आकारले जाते, परंतु गाडगे महाराज पुलावर उभ्या केलेल्या वाहनधारकांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. पुलावरील वाहनांना नदीकिनारी ‘पे ॲन्ड पार्क’ मध्येच वाहने लावण्याची सक्ती केल्यास महापालिकेच्या उत्पन्नांत काही प्रमाणात वाढ होऊ शकते. “गाडगे महाराज पुलावर चारचाकी वाहने उभी करणे अयोग्य आहे. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत पार्क केलेल्या वाहनांमुळे पायी चालणाऱ्यांना जीव मुठीत धरून चालावे लागते

तसेच गाडगे महाराज पुलावरील संरक्षक कठड्यावरील पाईप नसल्याने कधीही काही दुर्घटना घडू शकते, त्यामुळे लवकरात लवकर गाडगे महाराज पुलावरील संरक्षक पाईप बसविण्यात यावा व बेशिस्त पार्किंग बाबत योग्य ती कारवाई करावी अशी मागणी महानगर पालिका आयुक्तांकडे करण्यात आली. यावर लवकरात लवकर उपाययोजना करण्यात येईल असे आश्वासन महानगरपालिका आयुक्तांनी दिले.
निवेदन देतांना नाशिक शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर कार्यध्यक्ष किरण पानकर, विभाग कार्याध्यक्ष संतोष जगताप, गणेश जाधव, दर्शन सहाणे, कैलास बोराडे, शैलेश धुमाळ, संदीप बोराडे, राहुल काळे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी