28 C
Mumbai
Saturday, April 13, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रआचारसंहिता लागतांनाच जरांगे पाटील भुजबळ फार्म परिसरात.नाशिक पोलिसांची धावपळ

आचारसंहिता लागतांनाच जरांगे पाटील भुजबळ फार्म परिसरात.नाशिक पोलिसांची धावपळ

ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ व मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारे जरांगे पाटील यांच्यात गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक चकमकी होताना दिसत आहे. जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षण आरक्षणासाठी आवाज उठविला आहे. तर मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसीतून आरक्षण देणार नाही असे ठामपणे सांगितले आहे. असे असताना आचारसंहिता लागण्याच्या एक दिवस आधीच अचानक भयानक शुक्रवारी रात्री जरांगे पाटील भुजबळ फार्म परिसरात आल्याची चर्चा पदाधिकाऱ्यांना समजताच त्यांच्या भुवया उंचावल्या आणि अचानक त्या ठिकाणी गर्दी होऊ लागली. त्यावेळी समजले की विलास पांगरकर यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी जरांगे पाटील आले आहेत.

ओबीसी एल्गार परिषदेत भुजबळांनी आपण 16 नोव्हेंबरलाच मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचे जाहिर केले होते. याच मेळाव्यात नाभिक समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याचेही पडसाद उमटले होते. तर, मनोज जरांगे पाटील बजेटमधूनही आरक्षण मागत असल्याची उपहासात्मक टीका देखील भुजबळांनी केली होती. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी राजीनामा द्या, नाही तर समुद्रात उडी मारा, असे म्हणत भुजबळांवर टीकास्त्र सोडले होते.

तर मनोज जरांगे यांनी “छगन भुजबळ माझ्या एकट्याच्या विरोधात बोलतात, म्हणून आम्ही बोललो. आता ते म्हणतात की, मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही, आम्हाला तेच पाहिजे होते. विनाकारण कोणाला टार्गेट करण्याचा माझा धंदा नाही. तसेही आरक्षण देऊ नका, असे बोलणारे तुम्ही कोण? असा सवाल करत कुणी मराठा आरक्षणाला विरोध केला तर सोडणार नाही, मग तो कुणीही असो, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता
फाटक्या कपड्यातल्या मराठ्यांची सरकारने चेष्टा केली आहे. आमच्या हक्काचं असून का आरक्षण मिळत नाही. तसंच अधिवेशनात सगे-सोयऱ्यांचा विषय यायलाच हवा होता असं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे. तसंच सरकारला त्यांची गरज आहे (छगन भुजबळ) आता मराठ्यांची गरज पडते की नाही ते पाहू असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले होते .
“छगन भुजबळचा विषयच काढू नका. गेले मराठे आरक्षणात तू बोंबलत बस. त्याची गरज जास्त असू शकते. जेलमध्ये लोकांना कसं न्यायचं ते त्याला माहीत आहे. जो समाज राजगादीवर बसवतो त्यांची गरज नसेल असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. तसंच आमच्यापेक्षा भुजबळांची गरज जास्त असेल. ज्यांनी या कायद्यावर एकमत दाखवलं त्यांचे सगे-सोयऱ्यांसाठी हात मोडले होते का? का पेन नव्हते सह्या करायला?” असे प्रश्न मनोज जरांगेंनी उपस्थित केले होते

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी