33 C
Mumbai
Monday, April 22, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिकमध्ये जीतोतर्फे महिलांना कराटे प्रशिक्षण

नाशिकमध्ये जीतोतर्फे महिलांना कराटे प्रशिक्षण

स्वसुरक्षा कार्यशाळेचा उद्देश महिलांना त्यांची सुरक्षा आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी स्व-संरक्षण तंत्राने सक्षम बनवणे हा आहे. त्यासाठी महिलांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी महिलांनी संरक्षण तंत्र आत्मसाद करावे असे आवाहन आंतरराष्ट्रीय कराटे प्रशिक्षक भूषण ओहोळ यांनी उपस्थित महिलांना केले.जितो संस्थेच्या वतीने बिझनेस बे येथे महिलांसाठी स्व सुरक्षा - महिला स्वसंरक्षण जागृती कार्यशाळेचे आयोजन आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रशिक्षित विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सहाय्याने प्रात्यक्षिकांमधून आंतरराष्ट्रीय कराटे प्रशिक्षक भूषण ओहोळ यांनी महिलांना स्वसंरक्षणाचे धडे दिले. यावेळी ते बोलत होते. या शिबिरात सुमारे ७० महिलांनी सहभाग नोंदविला.

स्वसुरक्षा कार्यशाळेचा उद्देश महिलांना त्यांची सुरक्षा आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी स्व-संरक्षण तंत्राने सक्षम बनवणे हा आहे. त्यासाठी महिलांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी महिलांनी संरक्षण तंत्र आत्मसाद करावे असे आवाहन आंतरराष्ट्रीय कराटे प्रशिक्षक भूषण ओहोळ यांनी उपस्थित महिलांना केले.जितो संस्थेच्या वतीने बिझनेस बे येथे महिलांसाठी स्व सुरक्षा – महिला स्वसंरक्षण जागृती कार्यशाळेचे आयोजन आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रशिक्षित विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सहाय्याने प्रात्यक्षिकांमधून आंतरराष्ट्रीय कराटे प्रशिक्षक भूषण ओहोळ यांनी महिलांना स्वसंरक्षणाचे धडे दिले. यावेळी ते बोलत होते. या शिबिरात सुमारे ७० महिलांनी सहभाग नोंदविला.

यावेळी संस्थेच्या अध्यक्षा कल्पना पाटणी, मुख्य सचिव वैशाली जैन, मोनालिसा जैन, संयोजक अर्चना शहा, सहसंयोजक श्रद्धा कटारिया, खजिनदार सपना पहाडे, सुनंदा शहा, आरती नहार यांच्यासह जेएलडब्ल्यू टीमचे सदस्य उपस्थित होते.

यावेळी प्रशिक्षक भूषण ओहोळ यांनी महिलांनी स्वसंरक्षण तंत्राचा जबाबदारीने वापर केव्हा आणि कसा करायचा याचे तपशीलवार स्पष्टीकरण दिले. त्याने प्रशिक्षणाच्या संरक्षणात्मक स्वरूपावर जोर देत स्वसंरक्षण केवळ आत्म संरक्षणासाठी आहे ते आक्रमकतेसाठी नाही असे सांगितले. तसेच जेव्हा कोणी हल्ला करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ओरडणे, हल्लेखोराच्या कमकुवत भागांना लक्ष्य करणे, मनगट लॉक तंत्र, स्कार्फ, चावी किंवा मुठी यासारख्या वस्तूंचा स्व-संरक्षणासाठी शस्त्र म्हणून वापर कसा करायचा याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवून प्रशिक्षण दिले.

यावेळी संस्थेच्या मुख्य सचिव वैशाली जैन यांनी नवकार मंत्राच्या जपाने शिबिराचा शुभारंभ केला. या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा कल्पना पटनी यांनी सर्व सहभागींचे स्वागत करत स्वसंरक्षण शिक्षणाच्या महत्त्वावर मार्गदर्शन केले. आंतरराष्ट्रीय कराटे प्रशिक्षक म्हणून भूषण ओहोळच्या व्यापक अनुभवावर प्रकाश टाकला. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी संयोजक अर्चना शहा, सहसंयोजक श्रद्धा कटारिया, खजिनदार सपना पहाडे, सुनंदा शहा, आरती नहार, मोनालिसा जैन यांनी अथक परिश्रम घेतले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी