33 C
Mumbai
Monday, April 22, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिकमध्ये मनपा प्रशासन विरोधात प्रहार आक्रमक

नाशिकमध्ये मनपा प्रशासन विरोधात प्रहार आक्रमक

शहरातील अटल स्वाभिमान दिव्यांग भवनचे ई-लोकार्पण शनिवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. दरम्यान यावर प्रहार जनशक्ती पक्षाने आक्षेप घेत महापालिका प्रशासनाने दिव्यांग विभाग मंत्रायलयाचे अध्यक्ष आ. बच्चू कडु यांना जाणीवपूर्वक टाळ्ल्याचा आरोप करत याविरोधात सोमवारी (दि.12) महापालिकेच्या प्रवेशद्वारावर जोरदार आंदोलन केले. तसेच आ. बच्चू कडू यांना बोलावून दिव्यांग केंद्राचे उदघाटन करण्याची मागणी प्रहारच्या वतीने करण्यात आली.जिल्हाप्रमुख शरद शिंदे, दिव्यांग जिल्हाप्रमुख रविद्र टीळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी दिलेल्या निवेदनात दिव्यांग भवनाच्या लोकार्पण कार्यक्रमास दिव्यांग विभाग (मंत्रालय) अध्यक्ष आ.बच्चू कडु यांची नियोजित वेळ घेऊन प्रमुख पाहुणे म्हणून बोलविणे आवश्यक होते.

शहरातील अटल स्वाभिमान दिव्यांग भवनचे ई-लोकार्पण शनिवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. दरम्यान यावर प्रहार जनशक्ती पक्षाने आक्षेप घेत महापालिका प्रशासनाने दिव्यांग विभाग मंत्रायलयाचे अध्यक्ष आ. बच्चू कडु यांना जाणीवपूर्वक टाळ्ल्याचा आरोप करत याविरोधात सोमवारी (दि.12) महापालिकेच्या प्रवेशद्वारावर जोरदार आंदोलन केले. तसेच आ. बच्चू कडू यांना बोलावून दिव्यांग केंद्राचे उदघाटन करण्याची मागणी प्रहारच्या वतीने करण्यात आली.

जिल्हाप्रमुख शरद शिंदे, दिव्यांग जिल्हाप्रमुख रविद्र टीळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी दिलेल्या निवेदनात दिव्यांग भवनाच्या लोकार्पण कार्यक्रमास दिव्यांग विभाग (मंत्रालय) अध्यक्ष आ.बच्चू कडु यांची नियोजित वेळ घेऊन प्रमुख पाहुणे म्हणून बोलविणे आवश्यक होते. परतु स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिका प्रशासन यांनी जाणीवपूर्वक आ. कडु यांना नियोजित कार्यक्रमाची माहिती न देता एनवेळी शुक्रवारी (दि.9) फोनवर कार्यक्रमाची माहिती दिली. निमंत्रण पत्रिका बनविली. त्या पत्रिकेतील नावामध्ये ही चूक केली. यातून असे दिसते की, प्रशासनाने जाणीवपूर्वक आ. कडू यांना टाळ्ले. पालिका प्रशासनाने आ. बच्चू कडू यांची नियोजित वेळ घेऊन पुन्हा कार्यक्रम घ्यावा. तसेच शहरातील दिव्यांग बांधवांना या कार्यक्रमास स्वाभिमानाने बोलवावे. येत्या दहा दिवसात यावर निर्णय न झाल्यास प्रहार जनशक्ति पक्षाकडून तीव्र आदोलन केले जाइल. असा इशारा जिल्हाप्रमुख शरद शिंदे यांनी दिला. यावेळी उत्तर महाराट्र संपर्क प्रमुख दत्तु बोडके, उपजिल्हाप्रमुख अमजद पठाण, उत्तर महाराष्ट्र दिव्यांग प्रमुख जकब पील्ले, जिल्हा चिटणीस समाधान बागुल, शहर प्रमुख संतोष माळोदे, तालुका प्रमुख गोकुळ कासार, आयटी प्रमुख कमलाकर शेलार, शहर प्रमुख शाम गोसावी, संध्या जाधव, वैशाली अनवट, सीमा पवार, संतोष मानकर, भाउसाहेब सांगळे, यशंवत सापुते आदी उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी