34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रकरंजगाव व सायखेडा येथील पानवेली काढण्यास प्रारंभ खंडू बोडके

करंजगाव व सायखेडा येथील पानवेली काढण्यास प्रारंभ खंडू बोडके

निफाड तालुक्यातील गोदाकाठच्या गोदावरी नदीपात्रात पानवेलींच्या गंभिर प्रश्नांकडे करंजगावचे माजी सरपंच, राज्य बियाणे उपसमितीचे सदस्य खंडू बोडके पाटील यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना घेराव घालत लक्ष वेधल्याने सदर पानवेली काढण्यास पाटबंधारे विभागाचे प्रारंभ केला आहे. खंडू बोडके पाटील यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनास पानवेली काढण्यास भाग पाडल्याने गोदाकाठवासियांनी समाधान व्यक्त केले आहे.गोदाकाठच्या नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न पाणवेलीमुळे निर्माण झाला होता. अनेक गावांमध्ये दूषित पाण्यामुळे साथीचे आजार फैलावले होते.लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही ह्या पाणवेली काढण्यास दुर्लक्ष केले जात होते.

त्यामुळे मागील आठवड्यात चांदोरी येथे वाळू डेपो उद्घाटनास आलेले महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनाच खंडू बोडके पाटील यांनी पाणवेली काढल्याशिवाय वाळू उपसा करू नये अशी मागणी करत शिवसैनिकांसह त्यांना घेराव घालत जाब विचारला होता. त्यामुळे तातडीने पाणवेली काढण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डी गंगाथरण यांना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले होते. त्यामुळे तत्काळ दखल घेत पाटबंधारे विभागाने सदर कामासाठी २५ लक्ष रुपयांची तरतूद करत करंजगाव व सायखेडा येथे दोन पोकलेन जेसीबी मशिनच्या साहाय्याने या पाणवेली हटविण्यास सुरुवात केली आहे. मात्र अजून जास्त मशीन पूर्ण पाणवेलीची तातडीने विल्हेवाट लावावी याबाबत आज खंडू बोडके पाटील यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांच्याशी चर्चा केली. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आक्रमक भूमिका घेवून पानवेलीचा अतिशय गंभीर प्रश्न मार्गी लावण्याबद्दल गोदाकाठवासियांनी खंडू बोडके पाटील यांचे आभार मानले आहे.

गोदापात्रातील पुर्ण पाणवेली काढल्याशिवाय प्रशासनाने वाळू उपसा सुरू करण्यास घाई करू नये. जागतिक रामसरचा दर्जा दिलेल्या नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारन्यात दरवर्षी पाणवेली असल्याने गोदावरीचे पावित्र धोक्यात आले आहे. त्यामुळे याबाबत लवकरच पक्षीमित्र व गोदाकाठच्या नागरिकांच्या सहकार्याने गोदावरी बचाव कृती संघर्ष समितीची स्थापना करुन राष्ट्रीय हरित लवादाकडे अपील करण्याबाबत चर्चा करुन गोदावरी प्रदूषण रोखण्यासाठी पावले उचलली जातील.
— खंडू बोडके-पाटील
सदस्य: राज्य बियाणे उपसमिती, मुंबई
माजी सरपंच : करंजगाव ता. निफाड

राज्य बियाणे उपसमितीचे सदस्य खंडू बोडके पाटील यांच्या प्रयत्नाने करंजगाव येथे पोकलेन जेसीबीच्या साहाय्याने पानवेली काढण्याचे सुरू असलेले काम.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी