26 C
Mumbai
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक विक्रेत्याच्या जागेवर अनधिकृत मंदिर उभारणी करण्यास प्रोत्साहन दिल्याचा आरोप लक्ष्मण जायभावे

नाशिक विक्रेत्याच्या जागेवर अनधिकृत मंदिर उभारणी करण्यास प्रोत्साहन दिल्याचा आरोप लक्ष्मण जायभावे

खासगी बांधकाम व्यावसायिकाने आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी माणिक नगर येथील "अण्णाभाऊ साठे आदर्श भाजी मार्केट" च्या जागेला विरोध दर्शविला असून एका विक्रेत्याच्या जागेवर अनधिकृत मंदिर उभारणी करण्यास प्रोत्साहन दिल्याचा आरोप भाजी विक्रेत्यांसह माजी नगरसेवक लक्ष्मण जायभावे यांनी पत्रकार परिषदेप्रसंगी केला.यावेळी माध्यमांशी संवाद साधतांना जायभावे यांनी सांगितले कि, माणिक नगर येथील "अण्णाभाऊ साठे आदर्श भाजी मार्केट" मध्ये एका ठिकाणी स्थानिक नागरिकांनी चबुतऱ्यावर रात्रीच्या वेळी अनधिकृतरित्या मंदिराची उभारणी केली होती. त्यानंतर प्रकरणाला जातीय वादविवादाचे रूपांतर तयार झाले होते. याठिकाणी गेल्या कित्येक वर्षांपासून भाजी बाजार असून २०११ मध्ये भाजी बाजाराचे नामकरण करण्याचा प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती.

खासगी बांधकाम व्यावसायिकाने आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी माणिक नगर येथील “अण्णाभाऊ साठे आदर्श भाजी मार्केट” च्या जागेला विरोध दर्शविला असून एका विक्रेत्याच्या जागेवर अनधिकृत मंदिर उभारणी करण्यास प्रोत्साहन दिल्याचा आरोप भाजी विक्रेत्यांसह माजी नगरसेवक लक्ष्मण जायभावे यांनी पत्रकार परिषदेप्रसंगी केला.यावेळी माध्यमांशी संवाद साधतांना जायभावे यांनी सांगितले कि, माणिक नगर येथील “अण्णाभाऊ साठे आदर्श भाजी मार्केट” मध्ये एका ठिकाणी स्थानिक नागरिकांनी चबुतऱ्यावर रात्रीच्या वेळी अनधिकृतरित्या मंदिराची उभारणी केली होती. त्यानंतर प्रकरणाला जातीय वादविवादाचे रूपांतर तयार झाले होते. याठिकाणी गेल्या कित्येक वर्षांपासून भाजी बाजार असून २०११ मध्ये भाजी बाजाराचे नामकरण करण्याचा प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती.

त्यानंतर याठिकाणी २०१४ मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या अर्धाकृती पुतळा बसविण्यास महापालिकेतर्फे परवानगी देण्यात आली होती. दरम्यान या भाजी मार्केट मध्ये अगदी छोट्या जागेत रात्रीतून चबुतरा बांधून मंदिराची उभारणी करण्यात आली होती. त्यानंतर या मुद्द्यावरून दोन समाजात तेढ निर्माण होतील असे वातावरण तयार झाले होते. या ठिकाणी असलेला भाजी मार्केटचा भूखंड हा महापालिकेचा असून त्याच्या बाजूला खासगी बांधकाम व्यावसायिक माणिक सोनवणे यांचा भूखंड असून त्यांच्या भूखंडाची किंमत वाढावी याकरिता ते राजकारण करत असल्याचा आरोप भाजी विक्रेत्यांनी केला आहे.
या प्रश्नि महापालिका आयुक्तांनी भाजी मार्केटला भेट देऊन येथील ९३ विक्रेत्यांना न्याय द्यावा अशी मागणी भाजी मार्केट अध्यक्ष मिरा साबळे, अंजना महाले,लता जाधव,प्रमिला जाधव,मंगला महाजन,त्रंबक भास्कर आदींसह भाजी विक्रेत्यांनी केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी