28 C
Mumbai
Saturday, April 13, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक रोडला पुन्हा बिबट्याची दहशत नागरिकात घबराट

नाशिक रोडला पुन्हा बिबट्याची दहशत नागरिकात घबराट

जयभवानी रोड वरील लोणकर मळा मुख्य रस्त्यावर मध्यरात्री बिबट्याचा मुक्त संचार सुरु होता. एका सिसिटीव्ही कॅमेरा मध्ये तो कैद झाल्याने रहिवासी मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल मध्यरात्री 2 वाजून 45मिनिटांने लोणकर मळा, मुख्य रस्ता येथे कुत्रे चा जोरदार भुकण्याचा आवाज आल्याने काही राहिवसी यांना जाग आली. त्यांनी बाहेर डोकावून पाहिले असता फर्नांडीस वाडी कडून आत लोणकर मळा कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर बिबट्याचा मुक्त संचार सुरु होता. पाच, दहा मिनिटांनंतर बिबट्या पुन्हा माघारी फिरला मात्र जाताना बिबट्या काही कुत्र्याच्या दिशेने धावला काहीही हती न लागल्याने त्याच्या हातून शिकार हुकली.हा सर्व प्रकार राहिवसी संदीप लोणकर यांच्या बंगल्यातील सिसिटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाले आहे.

जयभवानी रोड वरील लोणकर मळा मुख्य रस्त्यावर मध्यरात्री बिबट्याचा मुक्त संचार सुरु होता. एका सिसिटीव्ही कॅमेरा मध्ये तो कैद झाल्याने रहिवासी मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल मध्यरात्री 2 वाजून 45मिनिटांने लोणकर मळा, मुख्य रस्ता येथे कुत्रे चा जोरदार भुकण्याचा आवाज आल्याने काही राहिवसी यांना जाग आली. त्यांनी बाहेर डोकावून पाहिले असता फर्नांडीस वाडी कडून आत लोणकर मळा कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर बिबट्याचा मुक्त संचार सुरु होता. पाच, दहा मिनिटांनंतर बिबट्या पुन्हा माघारी फिरला मात्र जाताना बिबट्या काही कुत्र्याच्या दिशेने धावला काहीही हती न लागल्याने त्याच्या हातून शिकार हुकली.हा सर्व प्रकार राहिवसी संदीप लोणकर यांच्या बंगल्यातील सिसिटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाले आहे.या भागातील सामाजिक कार्यकर्ते ऍड नितीन पंडीत यांनी याबाबत वन विभागाचे अधिकारी यांचेशी संपर्क केला.
बिबट्या च्या मुक्त संचारा मुळे राहिवसी, नागरिकांत भीती चे वातावरण निर्माण झाले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी