33 C
Mumbai
Monday, April 22, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक म्हसरूळ येथे आठ मार्च रोजी पवित्र पर्व महाशिवरात्री आणि जागतिक...

नाशिक म्हसरूळ येथे आठ मार्च रोजी पवित्र पर्व महाशिवरात्री आणि जागतिक महिला दिन यांचा कार्यक्रम उत्साहात

पाच विकारांनी ग्रासलेल्या ह्या कलयुगी रात्रीत नवीन सुराज्य- रामराज्य आण्यासाठी राजकारणाचे शुद्धीकरण व्हायला हवे आजचे राजकारण स्वार्थ वृत्तीने बरबटलेले आहे. भारताला पुन्हा विश्वगुरू बनवण्यासाठी आपल्याला त्याग व निस्वार्थ वृत्तीने कार्य करायला हवे असे प्रतिपादन मठाधीपती श्री श्री 1008 महामंडलेश्वर शांतिगिरीजी महाराज ह्यांनी आपल्या संबोधनात केले.पवित्र पर्व महाशिवरात्री आणि जागतिक महिला दिन यांचा कार्यक्रम ब्रह्माकुमारीज ' प्रभू प्रासाद ' म्हसरूळ येथे दिनांक आठ मार्च रोजी उमंग -उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ब्रह्मकुमारी संस्थेच्या नाशिक जिल्हाप्रमुख राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी उपस्थिती होत्या.आदरणीय राजयोगीनी वासंती दीदी ह्यांनी 'जब जब नारी जागेगी स्वर्ग धरा पर लायेगी' ह्या उदघोषनाचा अर्थ संक्षिप्त पणे सांगितला.

पाच विकारांनी ग्रासलेल्या ह्या कलयुगी रात्रीत नवीन सुराज्य- रामराज्य आण्यासाठी राजकारणाचे शुद्धीकरण व्हायला हवे आजचे राजकारण स्वार्थ वृत्तीने बरबटलेले आहे. भारताला पुन्हा विश्वगुरू बनवण्यासाठी आपल्याला त्याग व निस्वार्थ वृत्तीने कार्य करायला हवे असे प्रतिपादन मठाधीपती श्री श्री 1008 महामंडलेश्वर शांतिगिरीजी महाराज ह्यांनी आपल्या संबोधनात केले.पवित्र पर्व महाशिवरात्री आणि जागतिक महिला दिन यांचा कार्यक्रम ब्रह्माकुमारीज ‘ प्रभू प्रासाद ‘ म्हसरूळ येथे दिनांक आठ मार्च रोजी उमंग -उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ब्रह्मकुमारी संस्थेच्या नाशिक जिल्हाप्रमुख राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी उपस्थिती होत्या.आदरणीय राजयोगीनी वासंती दीदी ह्यांनी ‘जब जब नारी जागेगी स्वर्ग धरा पर लायेगी’ ह्या उदघोषनाचा अर्थ संक्षिप्त पणे सांगितला.

तसेच परमपिता परमात्मा शिव-निराकार ज्योतिबिंदू ह्या भुतालावर अवतरीत होऊन प्रजापिता ब्रह्मा यांच्या द्वारे युग परिवर्तनाचे पवित्र कार्य करत आहेत हा संदेश दिला. ह्या महाशिवरात्री पर्वात ज्ञानाचा कलश मातांच्या मस्तकावर ठेऊन हे कार्य मागील 88 वर्षा पासून अविरतपणे सूरु आहे असे सांगितले.
विष्णू महाराज यांनी जय बाबाजी संस्थान आणि ब्रह्माकुमारीज संस्थेने समाजाच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याची सर्वाना ओळख करून दिली.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ह्या कार्यक्रमात शिव ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमासाठी बीके विना दीदी, बीके गोदावरी दीदी, बीके ज्योती दीदी, बीके अनिता दीदी, बीके विकास भाई, बीके सुरेश भाई,बीके मनोहर,बीके डॉ राजेश ह्यांच्या सह हजारोच्या संख्येने ब्रह्माकुमारीज परिवार उपस्तिथ होता.जय बाबाजी परिवारातर्फे रामानंद महाराज, हरिश्चंद्र पवार, अमर आढाव आणि इतर अनुयायी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुंदर आणि प्रभावी सूत्रसंचालन ब्रह्माकुमारी पूनम दीदी ह्यांनी केले. कार्यक्रमांची सांगता शिवस्मृती ध्यान-योगाने झाली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी