29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक मध्ये राज ठाकरे यांनी केली काळाराम मंदिरात आरती

नाशिक मध्ये राज ठाकरे यांनी केली काळाराम मंदिरात आरती

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिकच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आले असता त्यांनी मुलगा आणि सुनेसह काळारामाचे दर्शन घेतले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना पक्ष प्रमुख (उबाठा) उद्धव ठाकरे यांनी काळारामाचे दर्शन घेतल्यानंतर मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी शुक्रवार दि. ८ रोजी पुत्र अमित आणि सून मिताली ठाकरे यांच्यासह काळारामाचे दर्शन घेतले. यावेळी मंदिरात त्यांच्या हस्ते गणपती पुण्याहवाचन, षोडशोपचार पूजा, अभिषेक आणि महाआरती करण्यात आली. यावेळी मंगेश पुजारी, नरेश पुजारी, श्रीकांत पुजारी, मुकुंद पुजारी, नरेंद्र पुजारी यांनी पौराहित्य केले.

तसेच, विश्वस्त धनंजय पुजारी, अजय निकम, शुभम मंत्री, मंदार जानोरकर, दिलीप कैचे, मिलिंद तारे, एकनाथ कुलकर्णी यांनी ठाकरे परिवाराचा शाल आणि प्रभू काळारामाची प्रतिमा देऊन सत्कार केला.
यावेळी बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, प्रदीप पवार, अशोक मुर्तडक, सुदाम कोंबडे, दिलीप दातीर, सलीम शेख, सुजाता डेरे आदींसह मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी