30 C
Mumbai
Thursday, May 23, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रमतदान फुल करा, नाशिकला कुल करा! पर्यावरणप्रेमींचा जाहीरनामा लोकसभेतील उमेदवारांना सादर

मतदान फुल करा, नाशिकला कुल करा! पर्यावरणप्रेमींचा जाहीरनामा लोकसभेतील उमेदवारांना सादर

कधी काळी थंड हवेसाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिकमध्ये दिवसेंदिवस तापमान वाढीचे नवनवीन उच्चांक प्रस्थापित केले जात आहेत. वातावरणीय बदल, तापमान वाढीने शेतकरी, कष्टकरी हवालदिल झालेला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आणि उमेदवारांमध्येदेखील निसर्गाची जागृती व्हावी यासाठी पर्यावरणप्रेमींनी पर्यावरण जाहीरनामा तयार केला आहे, तो उमेदवारांना सादर करतानाच मतदान फुल करा. वातावरण कुल करा, असे आवाहन करण्यात येत आहे. नाशिकच्या पर्यावरणप्रेमी संघटनांकडून ‘जाहीरनामा निसर्गाचा खासदार नाशिकचा’ या घोषवाक्याने निसर्गप्रचाराची सुरुवात केलेली आहे.

कधी काळी थंड हवेसाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिकमध्ये दिवसेंदिवस तापमान वाढीचे नवनवीन उच्चांक प्रस्थापित केले जात आहेत. वातावरणीय बदल, तापमान वाढीने शेतकरी, कष्टकरी हवालदिल झालेला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आणि उमेदवारांमध्येदेखील निसर्गाची जागृती व्हावी यासाठी पर्यावरणप्रेमींनी (Environmentalists) पर्यावरण जाहीरनामा तयार केला आहे, तो उमेदवारांना सादर करतानाच मतदान फुल करा. वातावरण कुल करा, असे आवाहन करण्यात येत आहे. नाशिकच्या पर्यावरणप्रेमी (Environmentalists) संघटनांकडून ‘जाहीरनामा निसर्गाचा खासदार नाशिकचा’ या घोषवाक्याने निसर्गप्रचाराची सुरुवात केलेली आहे.(Make the vote full, make Nashik cool! Environmentalists submit manifesto to Lok Sabha candidates)

वातावरणीय बदल, तापमान वाढीने शेतकरी, कष्टकरी हवालदिल झालेला आहे. नदीला आईचा व डोंगरांना शिवाचा दर्जा देणारा निसर्गपूजक भारतीय समाज शाश्वत विकासाची परिभाषाच विसरलेला दिसतो. त्यामुळे पर्यावरण प्रेमींनी ही संकल्पना राबविण्यास सुरुवात केली आहे. नाशिकच्या पर्यावरणप्रेमी संघटनांकडून जाहीरनामा निसर्गाचा खासदार नाशिकचा या घोषवाक्याने निसर्गप्रचाराची सुरवात केलेली आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार नदीच्या निळ्या पूररेषेत प्रदूषणाचे पाइप, काँक्रीटीकरण नकोत तर नदी परिसंस्थेच्या विकासासाठी जमीनमालकांना योग्य मोबदला देऊन विविध भारतीय देशी वृक्ष प्रजातींच्या लागवडीसाठीच निधीचा वापर करून नदीला नदीचा दर्जा प्राप्त करून द्यावा. डोंगरांवरील उत्खनन थांबवावे, बोडक्या डोंगरांवर मोठ्या प्रमाणात वृक्षसंवर्धनाचे कार्य हाती घ्यावे. शेतजमिनीवर अनावश्यक काँक्रीटीकरणावर लगाम घालावा, प्रादेशिक गोवंश जगवून प्रदूषणमुक्त, विषमुक्त शाश्वत ग्रामविकासासाठी प्रयत्नशील खासदार निसर्गाच्या जाहीरनाम्यात अपेक्षित आहे. यासंदर्भातील जाहीरनामा शांतीगिरी महाराज यांना सादर करण्यात आला. यावेळी निशिकांत पगारे, मनीष बाविस्कर, योगेश बर्वे, सुनील परदेशी आदी उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी