28 C
Mumbai
Saturday, April 13, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रईडी, सीबीआयचा गैरवापर करीत विरोधकांना नेस्तनाबूत केले : सरदेसाई

ईडी, सीबीआयचा गैरवापर करीत विरोधकांना नेस्तनाबूत केले : सरदेसाई

ईडी, सीबीआय संस्थांचा गैरवापर करीत विरोधकांना नेस्तनाबूत करण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून केले जात आहे. त्यामुळे देशातील लोकशाही धोक्यात आली आहे. लोकशाही टिकविण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. पंतप्रधान मोदी पुन्हा सत्तेत आल्यास ही शेवटची निवडणूक राहील. यासाठी महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील युवा शक्तीने एकत्रितपणे ताकदीने उतरून कामाला लागावे असे आवाहन युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी केले. महाविकास आघाडीच्या युवा महाराष्ट्राभिमान मेळावा शनिवारी (ता.१६) तुपसाखरे लॉन्स येथे झाला. यावेळी सरदेसाई बोलत होते. मेळाव्यास युवा सेनेचे कार्यकारिणी सदस्य विक्रांत जाधव, सिध्देश शिंदे , उपनेत्या शीतल देवरूखकर, ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गिते, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, महानगरप्रमुख विलास शिंदे, कॉंग्रेस सरचिटणीस हेमलता पाटील, आदीसह नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

ईडी, सीबीआय संस्थांचा गैरवापर करीत विरोधकांना नेस्तनाबूत करण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून केले जात आहे. त्यामुळे देशातील लोकशाही धोक्यात आली आहे. लोकशाही टिकविण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. पंतप्रधान मोदी पुन्हा सत्तेत आल्यास ही शेवटची निवडणूक राहील. यासाठी महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील युवा शक्तीने एकत्रितपणे ताकदीने उतरून कामाला लागावे असे आवाहन युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी केले. महाविकास आघाडीच्या युवा महाराष्ट्राभिमान मेळावा शनिवारी (ता.१६) तुपसाखरे लॉन्स येथे झाला. यावेळी सरदेसाई बोलत होते. मेळाव्यास युवा सेनेचे कार्यकारिणी सदस्य विक्रांत जाधव, सिध्देश शिंदे , उपनेत्या शीतल देवरूखकर, ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गिते, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, महानगरप्रमुख विलास शिंदे, कॉंग्रेस सरचिटणीस हेमलता पाटील, शहराध्यक्ष आकाश छाजेड, स्वप्नील पाटील, जयेश पोकळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार गट) शहराध्यक्ष गजानन शेलार, युवकचे अध्यक्ष पुरूषोत्तम कड़लग, शाहु शिंदे, बाळकृष्ण निगळ, माकपाचे राहुल गायकवाड, दीपक दातीर, गणेश बर्वे, राहुल ताजनपुरे, प्रथमेश गिते, शंभू बागूल आदीसह नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कोरोना काळातील काम बघून तसेच महाविकास आघाडीची लोकप्रियता बघूनच हे सरकार पाडण्यात आल्याचा आरोप करीत, मोदी सरकारच्या कामावर सरदेसाई यांनी टिकास्त्र सोडले.मेळाव्यास उपस्थित शिवसेना (उबाठा गट), राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) व कॉंग्रेसच्या युवक पदाधिकाऱ्यांनी भाषणात, महाविकास आघाडीमागे एकत्रित राहण्याचा निर्धार व्यक्त केला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कोरोना काळातील काम बघून तसेच महाविकास आघाडीची लोकप्रियता बघूनच हे सरकार पाडण्यात आल्याचा आरोप करीत, मोदी सरकारच्या कामावर सरदेसाई यांनी टिकास्त्र सोडले.सत्ताधारी पक्षातील लोक दारावर येतील आणि सांगतील आमची गॅरंटी आहे आणि मतदान मागतील. त्यांना १० वर्षात काय दिले हे विचारा. राज्यात आता मोदी नव्हे तर, ठाकरे यांची गॅरंटी चालणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मेळाव्यास उपस्थित शिवसेना (उबाठा गट), राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) व कॉंग्रेसच्या युवक पदाधिकाऱ्यांनी भाषणात, महाविकास आघाडीमागे एकत्रित राहण्याचा निर्धार व्यक्त केला. तिन्ही पक्षातील युवकांची मोठी ताकद तयार झाली असून या माध्यमातून आघाडीसाठी दिवसरात्र काम करावे असे आवाहन विक्रांत जाधव यांनी केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी