33 C
Mumbai
Monday, April 22, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रहृदय रोगातून मुक्ती मिळवलेल्या चिमुकल्यासमवेत आमदार थोरात यांनी केला वाढदिवस साजरा

हृदय रोगातून मुक्ती मिळवलेल्या चिमुकल्यासमवेत आमदार थोरात यांनी केला वाढदिवस साजरा

ग्रामीण भागात अत्याधुनिक सेवा देणाऱ्या रुग्णालयाचे स्वप्न साकार होताना आपण बघतो आहोत. आज वाढदिवसाच्या निमित्ताने हॉस्पिटलमध्ये मोफत हृदयविकार शस्रक्रिया व प्रक्रिया झालेल्या बालकांसोबत वाढदिवस साजरी करण्याची संधी मिळाली याचे समाधान अधिक आहे. माझे वय आज ७१ वर्ष पूर्ण झाले. याआधी ७१ वाढदिवस झाले असतील पण एसएमबीटीच्या नंदी हिल्स कॅम्पसमधील हा वाढदिवस अविस्मरणीय राहील असे गौरवोद्गार माजी मंत्री, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले.ते एसएमबीटी नंदी हिल्स कॅम्पसमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ हर्षल तांबे, बोर्ड मेम्बर्स, एसएमबीटी संस्थेच्या विविध महाविद्यालये व हॉस्पिटलचे अधिष्ठाता, प्राचार्य, अधिकारीवर्ग यांच्यासह मोठ्या संख्येने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

अधिक माहिती अशी की, एसएमबीटीचे सर्वेसर्वा आणि कॉंग्रेस आमदार थोरात यांचा आज वाढदिवस होता. याप्रसंगी एसएमबीटी संस्थेच्या वतीने वेलनेस व्योयाग २०२४ मोहीम हाती घेण्यात आली. यासोबतच दर महिन्यात ३५ ते ४० लहान मुलांवर एसएमबीटी हार्ट इन्स्टीट्युटमध्ये मोफत हृदयविकार शस्रक्रिया व प्रक्रिया केल्या जात आहेत. त्यातील ३५ मुलांसोबत आमदार थोरात यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला.

राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या या बालकांसह त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावरील आनंद याप्रसंगी गगनाला भिडला होता. एसएमबीटी हॉस्पिटलनजीक समृद्धी महामार्गाचा इंटरचेंज आहे त्यामुळे मराठवाड्यातील रुग्णांना येथे येणे सोयीचे झाले आहे. सद्यस्थितीत २४ पेक्षा अधिक जिल्ह्यातील रुग्ण याठिकाणी उपचारासाठी येत आहेत. यासोबतच गुजरात व मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागातील रुग्ण याठिकाणी उपचार घेऊ लागले आहेत. हॉस्पिटलच्या माध्यमातून अनेक अत्याधुनिक शस्रक्रिया केल्या जात आहेत याचा मनस्वी आनंद होतो आहे. तळागाळातील रुग्णांना परवडणारी आरोग्यसेवा देण्यासाठी सर्वजण बांधील आहोत असे म्हणत त्यांनी रुग्णसेवा कशी घडावी याचे उदाहरणे दिली.

दुसरीकडे आजच्या दिवसाच्या निमित्ताने १९ डिसेंबर रोजी सुरु झालेली ५१ दिवसांच्या वेलनेस व्योयाग मोहिमेची आज सांगता झाली. एसएमबीटी परिवारातील ५०० पेक्षा अधिक सदस्यांनी ५४ टीम्सच्या माध्यमातून तब्बल १ लाख ११ हजार किलोमीटर अंतर पार केले. दररोज एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून हे अंतर नोंदविले जात होते. दररोज किमान दोन किमी चालण्याचे नियोजन करण्यात आले होते मात्र अनेकांनी व्यायाम हा निरोगी आयुष्याचा मंत्र म्हणत दररोज ३० किमी पर्यत चालण्याचा अनोखा विक्रम आपल्या नावे केला. या उपक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येकाला मेडल देऊन गौरविण्यात आले.

सुरुवातीला, आमदार थोरात यांचे आगमन झाल्यानंतर विद्यार्थिनीकडून औन्क्ष्ण करण्यात आले. यानंतर गेटजवळ असलेल्या गणपती मंदिरात मनोभावे आरती करण्यात आली. आरती झाल्यानंतर बेलाच्या झाडाचे वृक्षारोपण त्यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आयुर्वेद हॉस्पिटल प्राचार्य डॉ. प्रदीप भाबड यांनी त्यांना बेलाच्या झाडाबाबत अधिक माहिती देत या झाडाची निवड करण्याबाबत माहिती दिली.

एसएमबीटीच्या गेटपासून कार्यक्रमस्थळी येण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांसोबत आमदार थोरात यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी त्यांचा जीवनप्रवास उलगडण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांना त्यांनी हसत खेळत उत्तरे तर दिलीच शिवाय अनेक विद्यार्थ्यांसोबत फोटोसेशनदेखील केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी