32 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशकात सोमवार ठरला यंदाच्या मोसमातील सर्वांत उष्ण दिवस

नाशकात सोमवार ठरला यंदाच्या मोसमातील सर्वांत उष्ण दिवस

शहराच्या तापमानाचा आलेख चढता असून, तीन-चार दिवसांपासून दररोज कमाल व किमान तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे रात्रीचा उकाडाही वाढला असल्याने नाशिककर त्रस्त झाले आहेत. शनिवारी (दि. १३) ३७.७ अंश सेल्सिअस, रविवारी (दि. १४) ३८.४ अंश सेल्सिअस असे तापमान नोंदले गेल्यानंतर तिसऱ्या दिवशीही तापमानाचा आलेख चढता राहून सोमवारी (दि. १५) कमाल तापमान ४०.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले. त्यामुळे हा सोमवार यंदाच्या मोसमातील आतापर्यंतचा सर्वाधिक उष्ण दिवस ठरला. यावर्षी या अगोदर दि. २८ मार्च रोजी ३९.२ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले होते.

शहराच्या तापमानाचा (Temperature) आलेख चढता असून, तीन-चार दिवसांपासून दररोज कमाल व किमान तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे रात्रीचा उकाडाही वाढला असल्याने नाशिककर त्रस्त झाले आहेत. शनिवारी (दि. १३) ३७.७ अंश सेल्सिअस, रविवारी (दि. १४) ३८.४ अंश सेल्सिअस असे तापमान नोंदले गेल्यानंतर तिसऱ्या दिवशीही तापमानाचा आलेख चढता राहून सोमवारी (दि. १५) कमाल तापमान ४०.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले. त्यामुळे हा सोमवार यंदाच्या मोसमातील आतापर्यंतचा सर्वाधिक उष्ण दिवस (hottest day of the season) ठरला. यावर्षी या अगोदर दि. २८ मार्च रोजी ३९.२ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले होते.(Monday turned out to be the hottest day of the season.)

कमाल तापमानाबरोबरच किमान तापमानातही वाढ होत आहे. शनिवारी असलेल्या १८ अंश सेल्सिअस किमान तापमानात वाढ होऊन रविवारी १८.४ अंश सेल्सिअसची नोंद झाली. तर, सोमवारी त्यात थेट पाच अंश सेल्सिअसने वाढ होऊन ते २३.३ अंश सेल्सिअस नोंदले गेले. शहर व जिल्ह्यात ढगाळ वातावरण त्यातच कमाल व किमान तापमानात देखील वाढ झाल्याने प्रचंड उकाडा जाणवत आहे. वातावरणातील वाढता उष्मा व रात्री जाणवणाऱ्या उकाड्यामुळे शहर जिल्हावासीय हैराण झाले आहेत. दाच्या मोसमात पावसाचे प्रमाण कमी हिल्यामुळे शहर व जिल्ह्यातील तीन आज पावसाची शक्यता उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, पुणे या भागात ढगांच्या गर्जनेसह पाऊस होईल. दि. १७ ते १९ एप्रिल या काळात मध्य महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र या भागात स्थानिक वळवाचा पाऊस होईल. उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिकच्या मालेगाव, नांदगाव, येवला, मनमाडसह काही भागात देखील मंगळवारी (दि. १६) मेघगर्जनेसह वादळी पाऊस होईल; तर इतर सर्वच भागात तापमान वाढ कायम राहील, असा अंदाज हवामान अभ्यासक विजय जायभावे यांनी वर्तविला आहे. वर्षांच्या तुलनेत यावर्षीचा उन्हाळा अधिक प्रखरपणे जाणवत आहे. उन्हाळ्याचा पुढील दीड महिना अजून शिल्लक असून, शहराचे तापमान चाळिशीच्यापुढे आताच गेल्यामुळे मे महिन्यात पारा याही पुढे जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. उन्हाळ्याचा पुढील दीड महिना अजून शिल्लक असून, शहराचे तापमान चाळिशीच्यापुढे आताच गेल्यामुळे मे महिन्यात पारा याही पुढे जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी