30 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeमुंबईमतांसाठी प्रभू रामाचा गैरवापर करणाऱ्या भाजपाच्या नितीन गडकरींची उमेदवारी रद्द करा: अतुल...

मतांसाठी प्रभू रामाचा गैरवापर करणाऱ्या भाजपाच्या नितीन गडकरींची उमेदवारी रद्द करा: अतुल लोंढे

भारतीय जनता पक्ष सर्वकायदे धाब्यावर बसवून सातत्याने आचारसंहितेचा भंग करत आहे. भारतीय जनता पक्षाचे नागपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नितीन गडकरी व आमदार मोहन मते यांनी आदर्श आचारसंहितेचे उघडपणे उल्लंघन केले आहे. मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी भगवान श्रीरामाची पोस्टर्स वापरून आचारसंहितेचा भंग केल्याने नितीन गडकरी यांची उमेदवारी रद्द करा, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. राज्य निवडणुक अधिकारी यांनी लिहलेल्या पत्रात अतुल लोंढे म्हणतात की, नितीन गडकरी यांनी प्रचार मोहिमेमध्ये धर्माचा आधार घेत मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

भारतीय जनता पक्ष सर्वकायदे धाब्यावर बसवून सातत्याने आचारसंहितेचा भंग करत आहे. भारतीय जनता पक्षाचे नागपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नितीन गडकरी (Nitin Gadkari) व आमदार मोहन मते यांनी आदर्श आचारसंहितेचे उघडपणे उल्लंघन केले आहे. मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी भगवान श्रीरामाची पोस्टर्स (Shri Ram Posters) वापरून आचारसंहितेचा भंग केल्याने नितीन गडकरी यांची उमेदवारी रद्द करा, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी केली आहे. राज्य निवडणुक अधिकारी यांनी लिहलेल्या पत्रात अतुल लोंढे म्हणतात की, नितीन गडकरी यांनी प्रचार मोहिमेमध्ये धर्माचा आधार घेत मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे.(Cancel BJP’s Nitin Gadkari’s candidature for misusing Lord Ram for votes: Atul Londhe)

भगवान श्रीराम दर्शविणारी पोस्टर्स वापरली गेली आहेत, ज्यामुळे निवडणूक आचार संहितेचे उल्लंघन झाले आहे. भाजपाचा हा प्रकार अनैतिक असून धार्मिक मतदारांचे ध्रुवीकरण करणारा आहे. भाजपाने या पोस्टर्सचा वापर काँग्रेस पक्षाविरुद्ध द्वेष पसरवण्यासाठीही केला गेला आहे. भाजपा व नितीन गडकरी यांनी केलेला प्रकार आदर्श आचार संहितेचे उल्लंघन करणारा असून निवडणुक आयागाने तात्काळ त्यांची उमेदवारी रद्द करणे आणि भाजपवर योग्य दंड ठोठावण्यासह त्वरित कारवाई करावी.भाजपा व नितीन गडकरी यांनी केलेला प्रकार आदर्श आचार संहितेचे उल्लंघन करणारा असून निवडणुक आयागाने तात्काळ त्यांची उमेदवारी रद्द करणे आणि भाजपवर योग्य दंड ठोठावण्यासह त्वरित कारवाई करावी.
भारतीय जनता पक्षाचे सर्व नियम धुडकावत असताना निवडणुक आयोग सत्ताधारी भाजपावर कसलीच कारवाई करत नाही. सरकारी यंत्रणा भाजपाच्या कठपुतळ्या बाहुल्या झाल्या आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी हेलिकॉप्टरची तपासणी केली पण भाजपा नेत्यांवर कारवाई करण्यास घाबरते यावरून निवडणुका पारदर्शी घेण्याच्या जबाबदारीपासून निवडणुक आयोगा दूर पळत असून केवळ विरोधकांसाठीच आचारसंहितेचे नियम आहेत का, असा संतप्त सवालही लोंढे यांनी विचारला आहे.

भारतीय जनता पक्षाचे सर्व नियम धुडकावत असताना निवडणुक आयोग सत्ताधारी भाजपावर कसलीच कारवाई करत नाही. सरकारी यंत्रणा भाजपाच्या कठपुतळ्या बाहुल्या झाल्या आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी हेलिकॉप्टरची तपासणी केली पण भाजपा नेत्यांवर कारवाई करण्यास घाबरते यावरून निवडणुका पारदर्शी घेण्याच्या जबाबदारीपासून निवडणुक आयोगा दूर पळत असून केवळ विरोधकांसाठीच आचारसंहितेचे नियम आहेत का, असा संतप्त सवालही लोंढे यांनी विचारला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी