29 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeमहाराष्ट्रनारायण राणे - किरण सामंत यांच्यात घासाघीस, विनायक राऊत सुसाट

नारायण राणे – किरण सामंत यांच्यात घासाघीस, विनायक राऊत सुसाट

रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघाचा तिढा लवकर सुटला नाही तर रत्नागिरी लोकसभा महायुतीच्या हातून निसटते कि काय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार

रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघाचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये (Narayan Rane or Kiran Samant against Vinayak Raut ) .रत्नागिरी मतदार संघात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विनायक राऊत यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या विरोधात महायुती कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचच लक्ष होत. एकीकडे नारायण राणे यांच्या नावाची चर्चा होत असताना किरण सामंतही पुढे आले त्यामुळे महायुती कोणाला आपला उमेदवार म्हणून घोषित करणार हे पाहणं महत्वाचं ठरेन . त्यामुळे आधी उमेदवारीची लढत आणि नंतर लोकसभेची अशी परिस्थिती राणे आणि सामंत यांच्या बाबतीत उदभवलेली आहे. गंमत म्हणजे राणेंनेही उमेदवारीचे ४ अर्ज घेतलेत, तर किरण सामंत यांनीही ४ अर्ज घेतलेले आहेत. शिवाय किरण सामंत यांनी नुकतीच घेतलेली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट त्यांच्या बाजूने निकाल देते कि काय अशी चर्चा सध्या रंगतेय. उदय सामंत आणि किरण सामंत बंधू या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत हे त्यांच्या कृतीतून सध्या दिसत आहेच .. त्यांनी नुकतीच केलेली एक पोस्ट लगेच डिलीट हि केली पण ती स्क्रीनशॉटच्या माध्यमातून अजूनही फिरतेय, ज्यात त्यांनी [ मा. नरेंद्र मोदीजी पुन्हा पंतप्रधान होण्याकरिता व अब कि बार ४०० पार होण्याकरिता रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून किरण सामंत यांची माघार – किरण सामंत ] असे लिहिले होते. दुसरीकडे नारायण राणे २०१४ च्या निवडणुकीत झालेले राजकीय मतभेद विसरून पुन्हा एकदा दीपक केसरकरांची स्वेच्छा भेट घेताना दिसले,त्यामुळे केसरकर राणेंना पाठींबा देणार हे यातून दिसतंय. आम्ही अवघडचंही सोपं करू असं म्हणत हि लढत आपणच जिंकणार असा विश्वासही नारायण राणे यांनी दाखवला. हे झालं महायुतीच्या तिढ्या विषयी . यावर विनायक राऊत काय म्हणताहेत ते पाहूया . विनायक राऊत यांनी किरण सामंत असतील तर थोढफार आव्हान असेल मला पण नारायण राणे असतील तर मात्र २.५० लाखाची लीड घेऊन आम्हीच विजयी होणार असा दावा हि त्यांनी केला. नारायण राणेंना मी आव्हानच समजत नाही.. यावेळी आम्ही विजयाची हॅट्रिक करणार तर नारायण राणेंना पराजयाची हॅट्रिक करावी लागेल , असे हि राऊत म्हणाले . आणि म्हणूनच हि एकूण परिस्थिती पाहता रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघाचा तिढा लवकर सुटला नाही तर रत्नागिरी लोकसभा महायुतीच्या हातून निसटते कि काय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी