33 C
Mumbai
Monday, April 22, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक शहरात चटई क्षेत्र घोटाळा ,मनपा आयुक्तांकडे तक्रार

नाशिक शहरात चटई क्षेत्र घोटाळा ,मनपा आयुक्तांकडे तक्रार

नाशिक महापालिका प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकून पाथर्डी फाटा येथे बेकायदेशीर बांधकाम केल्याची तक्रार महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे. ही तक्रार दाखल होऊन १५ दिवस उलटल्यानंतरही नगर रचना विभागाकडून कुठलीच कारवाई होत नसल्याने मनपा प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकली की मनपा प्रशासन आणि विकासक यांनी संगनमताने ग्राहक आणि शासनाच्या डोळ्यात धूळ फेकली याबाबत तर्क वितर्क व्यक्त होत आहेत.या विषयी तक्रारदार अमोल गवळी यांनी सांगितले की मिळकतीमध्ये एका व्हिलाचे सुमारे ६० रो हाउसचे बांधकाम बिल्डरने केलेले आहे. त्यापैकी जवळपास ३० रोडाउसमध्ये ३ रूम किचन ऐवजी ४ रूम किचनचे बांधकाम करून नगरपालिकेने मंजुरी दिल्यापेक्षा जवळपास ३५० फुटाचे अतिक्रमण करणारे व बेकायदेशीर बांधकाम आहे.

रोहाउस क्र. १५ व १७ मध्ये ३ बीएचके ऐवजी ५ बीएचके असे बेकायदेशीर बांधकाम करून प्रत्येकी जवळपास ६०० चौ. फुटाचे अतिक्रमण करणारे बांधकाम करण्यात आलेले आहे. अशा बांधकामाला नगररचना अधिकारी यांनी परिस्थितीची पाहणी न करतां, जागेवर न जातां कम्प्लीशन प्रमाणपत्र दिले आहे. ते पुर्णपणे बेकायदेशीर आहे. जागेवर जावून पाहणी करावी व जवळपास ३२ रोहाउसमध्ये जे बांधकाम करण्यात आले ते तात्काळ बेकायदेशीर असल्याने पाडून टाकण्यात यावे. तसे न केल्यास नाईलाजाने जनआंदोलन उभे करावे लागेल व कारवाई करावी लागेल. त्याचे परिणामांना प्रशासनाला जबाबदार धरण्यात येईल.असा इशारा या तक्रारीत देण्यात आला आहे.

क्र. १५ व १७ मध्ये ३ बीएचके ऐवजी ५ बीएचके असे बेकायदेशीर बांधकाम करून प्रत्येकी जवळपास ६०० चौ. फुटाचे अतिक्रमण करणारे बांधकाम करण्यात आलेले आहे. अशा बांधकामाला नगररचना अधिकारी यांनी परिस्थितीची पाहणी न करतां, जागेवर न जातां कम्प्लीशन प्रमाणपत्र दिले आहे. ते पुर्णपणे बेकायदेशीर आहे. जागेवर जावून पाहणी करावी व जवळपास ३२ रोहाउसमध्ये जे बांधकाम करण्यात आले ते तात्काळ बेकायदेशीर असल्याने पाडून टाकण्यात यावे. या संदर्भात तक्रारदार अमोल गवळी म्हणाले कि मी याबाबत नगररचना विभागाकडे अनेक तक्रारी केल्या. मात्र हे गंभीर प्रकरण असताना त्यांनी याची कोणतीही दखल घेतली नाहि त्यामुळे मला आता आयुक्तांकडे पाठपुरावा करावा लागत आहे . आयुक्तांनी देखील याची दाखल घेतली नाही तर थेट राज्याच्या नगरविकास विभागाकडे याची तक्रार केली जाईल असे सांगितले
.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी