28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक सिव्हिलच्या स्थलांतराने रुग्णांची तारांबळ

नाशिक सिव्हिलच्या स्थलांतराने रुग्णांची तारांबळ

नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य इमारतीमधील अपघात कक्ष सोमवारी (दि. ६) नवीन कुंभमेळा इमारतीत स्थलांतरित झाला. यामुळे हॉस्पिटल स्थलांतराच्या पहिल्याच दिवशी रुग्णांसह सर्वांचीच तारांबळ उडाली. जुन्या इमारतीतील अतिदक्षता कक्ष (आयसीयू), एक्स-रे, मायनर ओटीसह इतर कक्षही आठवडाभरात स्थलांतरित होणार आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभाग (आयसीयू) आणि अपघात कक्षातील खाटांची संख्या २० ऐवजी आता ६० करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हाभरासह परराज्यातून येणा‍ºया रुग्णालयांना अतिदक्षता विभागात गोल्डन अवर्समध्ये व्हेंटिलेटर, आॅक्सिजनसह अतीमहत्वाच्या सुविधा मिळणार आहेत. अपघातासह अतिगंभीर रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यासाठी अपघात कक्ष कुंभमेळा इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आला आहे.

जिल्हा रुग्णालयात दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत आहे. दिवसभरात जिल्हाभरातून दीड हजाराहून अधिक रुग्ण येथे येतात. यामध्ये अनेक रुग्णांना गोल्डन अवर्समध्ये उपचार मिळणे गरजेचे असते. जिल्हा रुग्णालयातील मुख्य इमारतीमधील अतिदक्षता विभाग आणि आपत्कालीन कक्षात प्रत्येकी १० खाटा होत्या. वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत मर्यादित खाटा असल्याने अनेक रुग्णांना खाटांची प्रतिक्षा करावी लागते. शिवाय, रुग्णाला बेड्स उपलब्ध होत नसल्याने त्याच्यावर उपचार करताना वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांना अनेक अडचणींना सामोरे लागते. ही बाब लक्षात घेवून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे रुग्णालय सिफ्टींगचा निर्णय घेतला आहे. जिल्हा रुग्णालय ७०० खाटांचे असून, अतिदक्षता आणि आपत्कालीन विभागात खाटांअभावी होणारी परवड टाळण्यासाठी अतिरिक्त खाटांचे नियोजन करण्यात आले असून या विभागातील खाटांची संख्या आता ६० वर पोहचणार आहे.

कक्ष शोधसाठी कसरत

अपघात कक्ष नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आल्याने अनेकांना मोठी शोधाशोध करावी लागली. अनेक रुग्णांना नवीन इमारतीकडे कोठून जायचे ते समजले नाही. त्यामुळे रुग्णांसह नातेवाईक आणि रुग्णवाहिका चालकांना कक्षाचा शोध घ्यावा लागला.

असे असतील नवीन इमारतीमधील कक्ष

कुंभमेळा इमारतीमधील तळमजला अपघात कक्ष, मायनर ओटी, पहिला मजला अतिदक्षता कक्ष, दुसरा मजला माड्युलर आयसीयू, तिसरा मजला महिला कक्ष आणि चौथा मजला पुरुष कक्षासाठी असणार आहे. अतिदक्षता कक्षामध्ये १२ परिचारिका, दोन इन्चार्ज व डॉक्टर असतील. चौथ्या मजल्यावर ५५ घाटा आहेत. या ठिकाणी ९ परिचारिका, दोन इन्चार्ज, अनुभवी व शिकाऊ असे एकूण २४ डॉक्टर असणार आहेत.

जिल्हा रुग्णालयात येणा‍ºया प्रत्येक रुग्णाला वेळेत उपचार मिळाला पाहिजे. प्रत्येक रुग्णाला गोल्डन अवर्समध्ये खाट उपलब्ध व्हावी, यासाठी अतिदक्षता विभाग आणि आपत्कालीन कक्षासह अन्य कक्षही कुंभमेळा इमारतीमध्ये स्थलांतरित केले जात आहेत. आठवडाभरात सर्व कक्ष स्थलांतरित होतील.

– डॉ. चारूदत्त शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी