28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक महापालिका उद्यानांवर करणार ६४ लाख रूपये खर्च

नाशिक महापालिका उद्यानांवर करणार ६४ लाख रूपये खर्च

सिडको विभागातील विकसित दहा उद्यानांच्या देखभाल दुरूस्तीसाठी महापालिकेतर्फे ६४ लाख रूपयांचा खर्च करणार आहे. यासाठीची निविदा प्रक्रिया काढण्यात आली आहे. या कामासाठी दोन निविदा पात्र झाल्यानंतर प्रथमच मूदतवाढ दिली आहे. याबाबत मनपा प्रशासनाने महासभेवर प्रस्ताव ठेवला होता, त्यात ही मंजुरी देण्यात आल्याने अंदाजपत्रकातील देखभाल दुरूस्तीच्या माध्यमातून ही रक्कम देय केली आहे. ३ नोव्हेंबर, २०२३ रोजी या ई-निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यानंतर शहरात जुन्या पारंपरिक उद्यानांची संख्या मोठी आहे. मध्यवर्ती भागातील नेहरू उद्यान, गंगापूर मार्गावरील प्रमोद महाजन उद्यान, सातपूरचे वसंतराव कानेटकर उद्यान, नाशिक रोड परिसरात सोमाणी गार्डन, दुर्गा उद्यान, पंचवटीत रामसृष्टी उद्यान उभारले आहे. 

सिडको विभागातील विकसित दहा उद्यानांच्या देखभाल दुरूस्तीसाठी महापालिकेतर्फे ६४ लाख रूपयांचा खर्च करणार आहे. यासाठीची निविदा प्रक्रिया काढण्यात आली आहे. या कामासाठी दोन निविदा पात्र झाल्यानंतर प्रथमच मूदतवाढ दिली आहे. याबाबत मनपा प्रशासनाने महासभेवर प्रस्ताव ठेवला होता, त्यात ही मंजुरी देण्यात आल्याने अंदाजपत्रकातील देखभाल दुरूस्तीच्या माध्यमातून ही रक्कम देय केली आहे. ३ नोव्हेंबर, २०२३ रोजी या ई-निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यानंतर शहरात जुन्या पारंपरिक उद्यानांची संख्या मोठी आहे. मध्यवर्ती भागातील नेहरू उद्यान, गंगापूर मार्गावरील प्रमोद महाजन उद्यान, सातपूरचे वसंतराव कानेटकर उद्यान, नाशिक रोड परिसरात सोमाणी गार्डन, दुर्गा उद्यान, पंचवटीत रामसृष्टी उद्यान उभारले आहे. दिंडोरी मार्गावरील कलानगरला आनंदसागर उद्यानातून एलईडी, जॉगिंग ट्रॅक आणि एफएम रेडिओची सुविधा देत वेगळा प्रयोग आहे. त्या पाश्व’भूमीवर सिडकोतील या नव्या दहा उद्यानांची देखभाल दुरूस्ती करण्यात येणार आहे.

उदयाने बकाल तरीही निविदा …..

आधीच्या टेंडरची मुदत संपण्याआधीच नवीन टेंडर वेळेत राबवायचे नाही. मुदत संपल्यानंतर पूर्वीच्या ठेकेदाराला मुदतवाढ द्यायची व विना टेंडर कामांची देयके काढायची, या नाशिक महापालिकेतील पायंड्यानुसार शहरातील २५० उद्याने व ५० जॉगिंग ट्रॅकच्या देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली दोन कोटी रुपयांच्या देयकाला स्थायी समितीवर मान्यता देण्यात आली आहे. मुळात पावसाळ्यात सर्व उद्याने बंद असताना व शहरातील जवळपास सर्वच उदयाने बकाल अवस्थेत असताना ही देयके कोणत्या कामासाठी काढली, असा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे.

नाशिक महापालिका हद्दीमध्ये जवळपास ५२४ उद्याने आहेत. यातील केवळ पंधरा ते २० उद्याने मोठी असून इतर उद्याने म्हणजे भूखंड विकसित करताना विकासकाने मनोरंजन पार्क म्हणून सोडलेल्या मोकळ्या जागा महापालिकेने उद्याने म्हणून विकसित केलेल्या आहेत. या विकसित केलेल्या उद्यानांमध्ये नगरसेवकांनी त्यांच्या निधीतून काही खेळणी अथवा ग्रीनजीमसाठी साहित्य बसवले असले, तरी बहुतांश उद्यानांमधील खेळणी तुटली असून ग्रीनजिमचे साहित्य लंपास झालेले आहे. पावसाळ्यात वाढलेले गवत, पाणी नसल्याने सुकलेली झाडे यामुळे या उद्यानांना बकाल अवस्था प्राप्त झाली आहे.

नाशिक महापालिका हद्दीमध्ये जवळपास ५२४ उद्याने आहेत. यातील केवळ पंधरा ते २० उद्याने मोठी असून इतर उद्याने म्हणजे भूखंड विकसित करताना विकासकाने मनोरंजन पार्क म्हणून सोडलेल्या मोकळ्या जागा महापालिकेने उद्याने म्हणून विकसित केलेल्या आहेत. या विकसित केलेल्या उद्यानांमध्ये नगरसेवकांनी त्यांच्या निधीतून काही खेळणी अथवा ग्रीनजीमसाठी साहित्य बसवले असले, तरी बहुतांश उद्यानांमधील खेळणी तुटली असून ग्रीनजिमचे साहित्य लंपास झालेले आहे. पावसाळ्यात वाढलेले गवत, पाणी नसल्याने सुकलेली झाडे यामुळे या उद्यानांना बकाल अवस्था प्राप्त झाली आहे

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी