33 C
Mumbai
Monday, April 22, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक शहराच्या पहिल्या वातावरणीय बदल कृती आराखड्याचे प्रकाशन 

नाशिक शहराच्या पहिल्या वातावरणीय बदल कृती आराखड्याचे प्रकाशन 

नाशिक महानगरपालिका यांनी वर्ल्ड रिसोर्सेस इंस्टीट्यूट इंडिया (डब्ल्यूआरआय इंडिया) यांच्या तांत्रिक सहाय्याने, २०२२ मध्ये नाशिक शहराच्या पहिल्या वातावरणीय बदल कृती आराखड्यावर काम करण्यास सुरुवात केली. या वातावरणीय बदल कृती आराखड्याचे प्रकाशन माननीय महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर (भा. प्र. से.) यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली, वर्ल्ड रिसोर्सेस इंस्टीट्यूट इंडिया म्हणजेच डब्ल्यू.आर.आय. इंडिया (WRI India) ह्या संस्थेने, नाशिक महानगरपालिकेसोबत नाशिक शहरासाठीचा वातावरणीय बदल कृती आराखडा म्हणजेच Climate Action Plan तयार केलेला आहे. डब्ल्यूआरआय इंडिया तर्फे तन्वी घैसास यांनी सर्वांचे स्वागत केले. डब्ल्यूआरआय इंडियाच्या मॅनेजर,  श्रीमती अंशूल मेनन यांनी नाशिक वातावरणीय बदल कृती आराखड्याचे सादरीकरण केले.

त्यानंतर डब्ल्यू.आर.आय. इंडिया चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. माधव पै यांनी आपले विचार सादर केले आणि सर्व भागधारकांचे हा आराखडा बनविण्यासाठी आभार मानले.  
या नंतर श्री. शिवकुमार वंजारी, शहर अभियंता, नाशिक मनपा, यांनी ह्या आराखड्यातील मनपा व इतर  संस्थांच्या योगदानाबद्दल आभार मानले. तसेच प्रक्रियेतील विस्तृत विश्लेषणाबाबत सर्वाना माहिती दिली. 
या नंतर, श्री. विजयकुमार मुंडे, उपयुक्त (पर्यावरण), मनपा यांनी नाशिक वातावरणीय बदल कृती आराखड्यासाठी सर्वांच्या योगदानाबद्दल आभार मानले. तसेच ह्या आराखड्याच्या प्रक्रियेतील महत्वाच्या बाबिंबद्दल माहिती दिली.   
नाशिक वातावरणीय बदल कृती आराखड्यातील महत्त्वाच्या बाबींवर प्रकाश टाकताना  नाशिक मनपा चे उपायुक्त (पर्यावरण), श्री. विजयकुमार मुंडे  म्हणाले, “नाशिक वतावरणीय कृती आराखडा सुरू करताना पर्यावरण विभागला आनंद होत आहे. नाशिक शहरासाठी प्रथमच सविस्तर संवेदनक्षमता  मूल्यांकन आणि हरितगृह वायू उत्सर्जन यादी तयार करण्यात आलेली आहे, जे राष्ट्रीय आणि जागतिक मानकाशी सुसंगत आहे. ह्या आराखड्यामध्ये नमूद केलेल्या सहा प्रमुख क्षेत्रांमध्ये गोदावरी नदी व्यवस्थापन, हरित जागा तयार करणे, इमारती आणि सार्वजनिक सुविधां मध्ये सौर ऊर्जेचा वापर करणे, इलेकट्रीक मोबिलिटी चा प्रसार करणे  आणि भूजल पुनर्भरण करणे यासारखे क्षेत्रीय उपक्रम हाती घेण्यासाठी एक स्पष्ट रोडमॅप आहे ज्यांना आम्ही प्राधान्य देणार आहोत. हे सर्व नियोजनबद्ध पद्धतीने अंमलात आणणे आणि त्याचे मूल्यमापन करणे  यासाठी आम्ही डेटा व्यवस्थापन आणि संशोधनासाठी एक समर्पित असे पर्यावरण आणि वातावरणीय बदल कृती सेल स्थापन करीत आहोत.  आम्ही ह्या सेल ची स्थापन करण्यासाठी आणि आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य वातावरणीय बदल कृती सेलकडून मदतीची अपेक्षा करतो.” 

यानंतर, ह्या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे राज्य वातावरणीय बदल कृती सेल चे संचालक, श्री. अभिजीत घोरपडे यांनी देखील सहभाग नोंदवून नाशिक शहरातील सर्व भागधारकांचे अभिनंदन केले. तसेच महाराष्ट्र राज्य सरकारचे वातावरणीय बदल कृती संदर्भातील महत्वाचे उपक्रम यासंबंधी माहिती दिली. 
ह्यानंतर नाशिक वातावरणीय बदल कृती आरखड्याचे प्रकाशन माननीय महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करांजकर (भा. प्र. से) यांच्या हस्ते, व महाराष्ट्र राज्याचे राज्य वातावरणीय बदल कृती सेल चे संचालक, श्री. अभिजीत घोरपडे, नाशिक मनपा, अतिरिक्त आयुक्त, श्रीमती स्मिता झगडे व श्री प्रदीप चौधरी, नाशिक महानगरपालिकेचे उपायुक्त श्री. विजायकुमार मुंडे आणि शहर अभियंता श्री. शिवकुमार वंजारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी अंबड इंडस्ट्रियल असोसिएशन चे सचिव ललित बूब, आणि मेंबर मनीष रावळ, तेजस चावण, नाशिक सीटीजेनस फोरमचे सचिन गुळवे, हिरवंकूर सोसायटीचे एन. बी शहा, नाशिक मनपाचे अधिकारी आणि इतर संस्थेचे प्रतिनिधि उपस्थित होते. 
WRI च्या मुक्ता साळुंखे यांनी ह्या सर्व कार्यक्रमाचे नियोजन व शेवटी आभार व्यक्त केले. WRI ची टीम लीओण नुनएस, लुबाईन रंगवला, वेद आपटे या कार्यक्रमात सहभागी होते.  

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी