30 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक मनपामध्ये निवडणुकीचा फटका नालेसफाईला बसणार

नाशिक मनपामध्ये निवडणुकीचा फटका नालेसफाईला बसणार

पावसाळ्यात नाशिकची मुंबईप्रमाणे तुंबई नको व्हायला यासाठी मनपा बांधकाम विभागाने नालेसफाईचे काम हाती घेणार आहे.पण यंदा निवडणुकीमुळे या कामाला काहिसा विलंब होण्याची चिन्हे ‌आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी येत्या वीस मेस मतदान होणार आहे. संपूर्ण मनपा प्रशासन निवडणुकीच्या कामात जुंपले गेले आहे. त्यामुळे मतदान पार पडल्यानंतर मे अखेरीस नालेसफाईला वेग येईल.महापालिका पावसाळ्यापूर्वी नाल्यातील घाण व गाळ काढते. अनेकदा मुसळधार पावसामुळे नाले, गटारी तुंबतात. त्यामुळे नागरी वस्तीत पाणी शिरण्याचा धोका असतो. अनेकदा व्यवस्थित साफसफाई न झाल्याने रस्त्यांवर गुडघ्याऐवढे पाणी साचते.

पावसाळ्यात नाशिकची मुंबईप्रमाणे तुंबई नको व्हायला यासाठी मनपा बांधकाम विभागाने नालेसफाईचे (drains) काम हाती घेणार आहे.पण यंदा निवडणुकीमुळे या कामाला काहिसा विलंब होण्याची चिन्हे ‌आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी येत्या वीस मेस मतदान होणार आहे. संपूर्ण मनपा प्रशासन निवडणुकीच्या कामात जुंपले गेले आहे. त्यामुळे मतदान पार पडल्यानंतर मे अखेरीस नालेसफाईला वेग येईल.महापालिका पावसाळ्यापूर्वी नाल्यातील घाण व गाळ काढते. अनेकदा मुसळधार पावसामुळे नाले, गटारी तुंबतात. त्यामुळे नागरी वस्तीत पाणी शिरण्याचा धोका असतो. अनेकदा व्यवस्थित साफसफाई न झाल्याने रस्त्यांवर गुडघ्याऐवढे पाणी साचते.(Nashik Municipal Corporation (NMC) polls to hit drains)

मागील काही वर्षांपासून नाशिक शहर किरकोळ पावसातही तुंबते. मोठ्या पावसात तर मनपाच्या नालेसफाईचे पितळ दरवर्षी उघडे पडते. दरवर्षी मनपा बांधकाम विभागाकडून मे महिन्याच्या सुरवातीपासूनच नाले सफाईला सुरुवात होते. शहरातील नैसर्गिक नाले, भुमिगत गटारींची जेसीबीच्या साह्याने साफसफाई केली जाते. जवळपास शहरातील सहाही विभागात दीड महिना ही मोहिम राबवली जाते. यंदा मात्र नालेसफाईला मे अखेर उजडणार आहे. सध्या लोकसभा निवडणुक सुरु आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी येत्या वीस मेस मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. इतर शासकीय कार्यालयांप्रमाणे मनपाचेही अडीच ते तीन हजार मनुष्यबळ निवडणूक प्रक्रियेत गुंतले आहे. त्यामुळे मनपात शुकशुकाट आहे. बांधकाम विभागही त्यास अपवाद नाही. प्राथमिक स्तरावर नालेसफाईचे नियोजन सुरु आहे. यंदा या मोहीमला मतदान पार पडल्यानंतर वेग येणार आहे.

नाले साफसफाईच्यादृष्टिने महापालिकेतर्फे पुढील आठवड्यात नियोजन करण्यात येत आहे. यासाठी आचारसंहितेचा कोणताही अडसर येणार नसून मंजूर निधीतून काम केले जाईल. -शिवकुमार वंजारी, शहर अभियंता, महापालिका

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी