28 C
Mumbai
Sunday, April 14, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक मनपातर्फे स्वच्छता जनजागृतीसाठी नृत्य व पथनाट्य स्पर्धा

नाशिक मनपातर्फे स्वच्छता जनजागृतीसाठी नृत्य व पथनाट्य स्पर्धा

नाशिक महानगर पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण २०२४ अनुषंगाने पर्यावरण संवर्धन व सभोवतालच्या परिसराच्या स्वच्छतेप्रती नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांकरिता नृत्य व पथनाट्य या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पथनाट्यकरिता २४ व नृत्याकरिता २२ अशा एकूण ४६ शाळांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेचा शुभारंभ अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला.या स्पर्धेकरिता ओला व सुका कचरा वर्गीकरण व त्याचे फायदे, प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम,स्वच्छते प्रति नागरिकांचे कर्तव्य, नदीपात्राचे होणारे प्रदूषण व संवर्धनाचे उपाय आदी विषय देण्यात आले होते. या स्पर्धेकरिता परीक्षक म्हणून मराठी अभिनेत्री नुपूर सावजी, नृत्य दिग्दर्शक सचिन शिंदे, गायक व संगीत दिग्दर्शक अमिताभ हरीनामे यांनी काम पाहिले.

स्पर्धेतील नृत्य या घटकातील प्रथम क्रमांक समाजश्री डॉ. प्रशांत दादा हिरे माध्यमिक विद्यालय यांनी, द्वितीय क्रमांक मराठा हायस्कुल गंगापूर रोड यांनी व तृतीय क्रमांक इस्पेलीअर स्कुल कामटवाडा या शाळांनी पटकावला तसेच पथनाट्य या घटकात प्रथम क्रमांक दिल्ली पब्लिक स्कुल यांनी द्वितीय मनपा शाळा क्र.२७ सातपूर तसेच तृतीय क्रमांक मनपा शाळा क्र. ६८ गणेश चौक सिडको यांनी मिळविला.दोन्ही स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर, अतिरिक्त आयुक्त (शहर) प्रदीप चौधरी, अतिरिक्त आयुक्त (सेवा) स्मिता झगडे, सिनेअभिनेते चिन्मय उदगीरकर यांच्या हस्ते अनुक्रमे १०,०००/-, ७५००/- व ५०००/- रुपये रोख व स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमास मनपाचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ.आवेश पलोड,उपायुक्त डॉ.विजयकुमार मुंडे, शहर अभियंता शिवकुमार वंजारी,अधीक्षक अभियंता संजय अग्रवाल, जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद, मनपाचे सर्व विभागीय स्वच्छता निरीक्षक, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

या स्पर्धेकरिता मनपा शाळा क्र.४९ जेल रोड, मनपा शाळा क्र.२८सातपूर, श्रीराम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पंचवटी, मनपा शाळा क्र.६८ गणेश चौक, समूह साधन केंद्र, शाळा क्र.४३, मराठा हायस्कुल, साधना इंग्लिश मेडीयम स्कुल, पोदार इंटरनॅशनल, नूतन मराठी प्राथमिक, काकासाहेब देवधर, कॅडेंस विद्यामंदिर, जिजामाता प्राथमिक विद्यामंदीर, शेट आर पी विद्यालय पंचवटी, अशोका युनिव्हर्सल सिन्नर, दिल्ली पब्लिक स्कुल, जनता विद्यालय नाशिक रोड,नेमीनाथ जैन विद्यालय चांदवड, आदर्श इंग्लिश मेडीयम स्कुल वणी, मनपा शाळा क्र.२७, आदर्श विद्यामंदिर नाशिक रोड, मनपा शाळा क्र.६३,मनपा शाळा क्र.७१,शासकीय कन्या विद्यालय, गुरुगोविंद सिंग पब्लिक स्कुल,मनपा शाळा क्र.८५, बिटको गर्ल्स हायस्कुल, ए पी पटेल हायस्कुल, होरायझन, मविप सनराईज,धनलक्ष्मी विद्यामंदिर आदी शाळांनी सहभाग नोंदविला.या कार्यक्रमाचे  सूत्रसंचलन जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांनी केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी