33 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeएज्युकेशननाशिकच्या सेंट थोमास मलंकारा कॅथॉलिक स्कूलमध्ये "क्रिसेंटा डिकेडस कोलाईड कार्निवल

नाशिकच्या सेंट थोमास मलंकारा कॅथॉलिक स्कूलमध्ये “क्रिसेंटा डिकेडस कोलाईड कार्निवल

 वासाळी येथील सेंट थोमास मलंकारा कॅथॉलिक स्कूलचा ८ वा वार्षिक स्नेह संमेलन ‘क्रिसेंटा डिकेडस कोलाईड कार्निवल’ या नावाने नुकताच साजरा करण्यात आला आहे.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मलंकारा सिरीयन कॅथॉलिक ट्रस्टचे सचिव व मार ग्रेगोरीयस कॉलेज ऑफ इंजिनियरिंगचे व्यवस्थापक रेव्ह. फादर मथ्यू पल्लीकुन्नल, माजी नगरसेविका इंदुबाई नागरे, पल्लवी पाटील,सेंट थोमास बेथनी कॉन्वेहट स्कूलच्या प्राचार्या सिस्टर प्रसादा एसआयसी, सरपंच आशा खेटरे, शाळा व्यवस्थापक रेव्ह. फादर जोबिन निनान, मुख्याध्यापिका नीलम चोखर, पालक-शिक्षक संघाचे अध्यक्षशिवकुमार नायडू, काँग्रेस सरचिटणीस दीपक राव आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.

यावेळी बोलतांना मलंकारा सिरीयन कॅथॉलिक ट्रस्टचे सचिव रेव्ह. फादर मथ्यू पल्लीकुन्नल म्हणाले की,
क्रिसेंटा’ म्हणजे वृदधी. गेल्या आठ वर्षात शाळेची दिवसेंदिवस होणारी वृद्धी लक्षात घेत शाळा व्यवस्थापनाने ८ वा वार्षिक स्नेह संमेलन ‘क्रिसेंटा डिकेडस कोलाईड कार्निवल’ या नावाने साजरा करण्याचा निर्णय घेतला. यावेळी विद्यार्थी व पालकांना ८ वर्षातील शाळेचा लेखाजोखा मांडला.मलंकारा सिरीयन कॅथॉलिक ट्रस्टचे सचिव रेव्ह. फादर मथ्यू पल्लीकुन्नल म्हणाले की,क्रिसेंटा’ म्हणजे वृदधी. गेल्या आठ वर्षात शाळेची दिवसेंदिवस होणारी वृद्धी लक्षात घेत शाळा व्यवस्थापनाने ८ वा वार्षिक स्नेह संमेलन ‘क्रिसेंटा डिकेडस कोलाईड कार्निवल’ या नावाने साजरा करण्याचा निर्णय घेतला. यावेळी विद्यार्थी व पालकांना ८ वर्षातील शाळेचा लेखाजोखा मांडला.

प्रमुख पाहुण्यांचे स्वागत शाळेच्या विद्यार्थीनी सुमधुर स्वागत गीताने व नृत्याने केले. शाळेचे प्रि-प्रायमरी विद्यार्थी आरोही चव्हाण आणि रुद्र भदाणे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी शाळेचा वार्षिक अहवाल सादर केला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सांस्कृतिक नृत्यांने करण्यात आली. मनोरंजनासाठी नाट्य सादरीकरनाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाची सांगता विद्यार्थी, शिक्षक व शिक्षिकेत्तर कर्मचारी यांच्या नृत्याने करण्यात आली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी