नाशिक महापालिकेच्या घनकचरा विभागाने नाशिकरोड विभागात जैविक कचरा विलगीकरण न करता घंटागाडीत टाकणार्या खाजगी हॉस्पिटलवर दंडात्मक कारवाई करुन दंड वसुल केले. नाशिक रोड विभागातील जैविक कचरा विलगीकरण न करता घंटागाडीत देतांना आढळुन आल्याने रेडीअंट प्लस हॉस्पिटल, अॅशुयअर केअर प्लस हॉस्पिटल, श्री हॉस्पिटल यांना प्रत्येकी १० हजार या प्रमाणे एकूण ३० हजार तर व्यावसायिक कचरा वर्गीकरण न केल्याने नाशिकरोड मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल, गुरुकृपा हॉस्पिटल यांना प्रत्येकी ५ हजार या प्रमाणे एकूण १० हजार दंड वसुल करण्यात आला.नाशिक महापालिकेच्या घनकचरा विभागाने नाशिकरोड विभागात जैविक कचरा विलगीकरण न करता घंटागाडीत टाकणार्या खाजगी हॉस्पिटलवर दंडात्मक कारवाई करुन दंड वसुल केले. नाशिक रोड विभागातील जैविक कचरा विलगीकरण न करता घंटागाडीत देतांना आढळुन आल्याने रेडीअंट प्लस हॉस्पिटल, अॅशुयअर केअर प्लस हॉस्पिटल, श्री हॉस्पिटल यांना प्रत्येकी १० हजार या प्रमाणे एकूण ३० हजार तर व्यावसायिक कचरा वर्गीकरण न केल्याने नाशिकरोड मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल, गुरुकृपा हॉस्पिटल यांना प्रत्येकी ५ हजार या प्रमाणे एकूण १० हजार दंड वसुल करण्यात आला.
मनपा आयुक्त डॉ.अशोक करंजकर, संचालक घनकचरा व्यवस्थापन विभाग डॉ. आवेश पलोड यांच्या आदेशानुसार नाशिकरोडचे विभागीय अधिकारी जवाहरलाल टिळे, स्वच्छता निरिक्षक अशोक साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक विजय जाधव , शतेजस गायकवाड विशाल घोलप, राहुल तासंबड, प्रवीण बिर्हाडे, स्वच्छता मुकादम जनार्दन घंटे , रंजित हंसराज , सुनिल वाघ आदींनी कारवाई केली.