28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक पुष्पोत्सवाने बहरणार महापालिका

नाशिक पुष्पोत्सवाने बहरणार महापालिका

महापालिका उद्याने व वृक्ष प्राधिकरण विभागाच्यावतीने ९ ते ११ फेब्रुवारी दरम्यान पुष्पोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार (दि.९) रोजी दुपारी ४ वाजता पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते उदघाटन होणार असून या सोहळयाला सिने अभिनेत्री तथा गायिका केतकी माटेगावकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदिप चौधरी यांनी दिली.महापालिकेतर्फे १९९६ पासून पुष्पोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या वर्षी ९ ते ११ फेब्रुवारी दरम्यान पुष्पोत्सव आयोजीत केला आहे. पुष्पोत्सवासाठी विविध गटात स्पर्धकांमार्फत १७९७ प्रवेशिका प्राप्त झाल्या. या प्रदर्शनात ४२ नर्सरी स्टॉल आणि २० फुड स्टॉल्सचे बुकिंग झाले आहे. महापालिका मुख्यालय इमारतीच्या तीनही मजल्यावर विविध गटांची मांडणी करण्यात येणार आहे. 

महापालिका उद्याने व वृक्ष प्राधिकरण विभागाच्यावतीने ९ ते ११ फेब्रुवारी दरम्यान पुष्पोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार (दि.९) रोजी दुपारी ४ वाजता पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते उदघाटन होणार असून या सोहळयाला सिने अभिनेत्री तथा गायिका केतकी माटेगावकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदिप चौधरी यांनी दिली.महापालिकेतर्फे १९९६ पासून पुष्पोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या वर्षी ९ ते ११ फेब्रुवारी दरम्यान पुष्पोत्सव आयोजीत केला आहे. पुष्पोत्सवासाठी विविध गटात स्पर्धकांमार्फत १७९७ प्रवेशिका प्राप्त झाल्या. या प्रदर्शनात ४२ नर्सरी स्टॉल आणि २० फुड स्टॉल्सचे बुकिंग झाले आहे. महापालिका मुख्यालय इमारतीच्या तीनही मजल्यावर विविध गटांची मांडणी करण्यात येणार आहे.पुष्पोत्सवासाठी विविध गटात स्पर्धकांमार्फत १७९७ प्रवेशिका प्राप्त झाल्या. या प्रदर्शनात ४२ नर्सरी स्टॉल आणि २० फुड स्टॉल्सचे बुकिंग झाले आहे. महापालिका मुख्यालय इमारतीच्या तीनही मजल्यावर विविध गटांची मांडणी करण्यात येणार आहे.

यात गुलाबपुष्पे, मोसमी फुले, फळे, भाजीपाला, हार, बुके, पुष्परचना, बोन्साय, कॅक्टस, शोभिवंत कुंडया ठेवल्या जाणार आहेत. उदघाटनाच्या दिवशी पालकमंत्री भुसे यांच्या हस्ते मानांकनाच्या ट्राफीचे वितरण करण्यात येणार असून त्यानंतर पुढील दोन दिवस हे पुष्प प्रदर्शन नागरीकांना पाहण्यासाठी सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत खुले असणार आहे. ११ फेब्रुवारी रोजी समारोपाला सिने अभिनेता किरण गायकवाड, सिने अभिनेत्री शिवानी बावकर उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते विजेत्यांना ट्राफीचे वितरण करण्यात येणार आहे.

सेल्फि पॉईट अन संगीत मैफील
प्रवेशव्दारावर फुलांची आकर्षक कमान उभारण्यात येणार असून प्रांगणात सेल्फी पॉईंट उभारण्यात येणार आहे. प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण मिनीएचर लॅन्डस्केपिंग करण्यात येणार आहे. १० फेब्रुवारी रोजी सकाळ सत्रात निसर्ग व फुलांवर आधारीत कविता सत्र आणि सायंकाळी संगीत मैफील रंगणार आहे. पुष्प स्पर्धेव्यतिरिक्त नागरिकांकडून निसर्गावर आधारित पेंटींग, फुलांची माहिती देणारे छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी