33 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक मनपाच्या नोकरभरतीला अडसर

नाशिक मनपाच्या नोकरभरतीला अडसर

महापालिकेत होणाऱ्या नोकर भरतीसाठी पालिका प्रशासनाने टीसीएस कंपनीशी करार केला आहे. गेल्या महिन्यात मनपानेे शासनाकडे नोकर भरतीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवलेला असून त्यास अद्याप मंजुरी मिळालेली नाही. दरम्यान पुढच्या काही दिवसांत लोकसभा निवडनुकीची आचारसंहिता लागू शकते. त्यामुळे नोकर भरतीची प्रक्रिया पूर्ण न झाल्यास आरोग्य व अग्निशमन च्या प्रस्तावीत 586 पदांसाठीच्या भरतीला ब्रेक बसेल. दरम्यान लोकसभेनंतर लगेचच विधानसभा निवडनुकीचे वारे वाहनार असल्याने या सर्व घडामोडीचा फटका नोकर भरतीला बसून थेट पुढच्या वर्षीच भरतीला मुहूर्त लागण्याची शक्यता आहे.नाशिक महापालिकेत चोवीस वर्षापासून नोकर भरती झालेली नाही. एकीकडे अपुऱ्या मनुष्यबळामुळे दैनंदिन कामावर प्रचंड ताण पडत असताना विविध विभागातील कर्मचारी-अधिकाऱ्यांची सेवानिवृत्त होणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

महापालिकेत होणाऱ्या नोकर भरतीसाठी पालिका प्रशासनाने टीसीएस कंपनीशी करार केला आहे. गेल्या महिन्यात मनपानेे शासनाकडे नोकर भरतीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवलेला असून त्यास अद्याप मंजुरी मिळालेली नाही. दरम्यान पुढच्या काही दिवसांत लोकसभा निवडनुकीची आचारसंहिता लागू शकते. त्यामुळे नोकर भरतीची प्रक्रिया पूर्ण न झाल्यास आरोग्य व अग्निशमन च्या प्रस्तावीत 586 पदांसाठीच्या भरतीला ब्रेक बसेल. दरम्यान लोकसभेनंतर लगेचच विधानसभा निवडनुकीचे वारे वाहनार असल्याने या सर्व घडामोडीचा फटका नोकर भरतीला बसून थेट पुढच्या वर्षीच भरतीला मुहूर्त लागण्याची शक्यता आहे.

नाशिक महापालिकेत चोवीस वर्षापासून नोकर भरती झालेली नाही. एकीकडे अपुऱ्या मनुष्यबळामुळे दैनंदिन कामावर प्रचंड ताण पडत असताना विविध विभागातील कर्मचारी-अधिकाऱ्यांची सेवानिवृत्त होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यामुळे महापालिकेचाच कणा वाकत आहे. माजी महापौर सतीश कुलकर्णी यांनी विशेष महासभा बोलावत नोकर भरतीला मंजुरी दिली. त्यानंतर प्रशासकीय राजवट आल्यानंतर भरतीसाठी प्रयत्न सुरु झाले. परंतु मागे चार ते पाच महिने महापालिकेला पूर्णवेळ आयुक्त च नसल्याचे भरतीला याचा फटका बसला. टीसीएस कंपनीशी करार होउन वर्ष होत आहे. परंतु या कंपनीकडे राज्यातील इतर महापालिकेतील भरतीची जबाबदारी असल्याने नाशिक मनपातील भरती प्रक्रिया संथ गतीने सुरु आहे. मंजूर 2 हजार 700 पदांपैकी आरोग्य व अग्निशमन विभागातील 586 पदे प्राधान्य देउन भरली जाणार आहे. गेल्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये नोकर भरतीची प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक होते. मात्र फेब्रुवारी उजाडला अद्याप नोकर भरतीला चाल मिळ्त नसल्याचे चित्र आहे. यामुळे भरती प्रक्रिया लोकसभेच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोना काळात आस्थपना खर्च खाली आल्याने नोकर भरतीच्या अपेक्षा उचवल्या. नंतर आस्थापना खर्च चाळीशी पार गेला. परंतु राज्य शासनाने आरोग्य व अग्निशमन या दोन विभागासाठी आस्थापनाची अट रद्द केली. सध्या पालिकेत मनुष्यबळाची मोठी आवश्यकता असली तरी प्रशासनाकडून त्यास चाल देण्याची आवश्यकता आहे. टीसीएस कंपनीला नोकर भरतीचे काम दिले आहे. परंत या प्रक्रियेला वेग मिळत नसल्याचे चित्र आहे. तीन वर्षावर सिंहस्थ कुंभमेळा आहे. त्यापूर्वीच भरती होणे आवश्यक आहे. यंदाचे वर्ष निवडणुकीचे आहे, लोकसभेनंतर विधानसभा आणि नंतरे सर्वाच्या नजरा लागलेली महापालिका निवडणूक आहे.

ठेकेदारांचे भले

सध्या महापालिकेत ठेकेदारी पद्धतीने विविध कामे केली जात आहे. यामध्ये शहर सफाइ, कचरा संकलन, पेस्ट कंट्रोल, उद्यानांची दुरुस्ती या विभागावर कोट्यावधींची उधळ्पट्टी केली जाते. भरती होत नसल्याने ठेकेदारी पध्दत अवलंबली जाते. किंवा कंत्राटी पद्धतीचे सोपस्कर पूर्ण केले जाते. मागील दहा ते पंधरा वर्षात शहराचा विस्तार कमालीचा वाढला आहे. नागरिकांना मुलभूत सोयी-सुविधा देताना पालिकेवर ताण पडतो आहे. अशावेळी भरती होणे आवश्यक असताना ठेकेदाराचेंच हीत साधले असल्याचे बोलले जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी