28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक मनपा उभारणार क्लायमेट सेल

नाशिक मनपा उभारणार क्लायमेट सेल

नाशिक शहराचा पर्यावरणीय बदल अहवाल नूकताच प्रकाशित झाला असून त्यात अनेक धोक्यांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी मनपा पर्यावरण विभाग क्लायमेट सेल उभारणार असून त्याद्वारे शहरासाठी धोक्यांची घंटा दर्शविण्यात आलेल्या मुद्यावर काम करुन हा धोका कमी कसा होईल यासाठी काम करणार आहे. त्यात शहरातील पर्यावरण प्रेमीनांही समाविष्ट करुन घेतले जाणार आहे.ग्लोबल वार्मिंगने जगासाठी धोक्याची घंटा वाजवली असून सर्वच देश कार्बन उत्जर्नासह प्रदूषण पातळी कशी कमी करता येईल त्यावर अॅक्शन प्लॅन तयार करत आहे. नूकताच नाशिक महापालिकेने पर्यावरण विभागाकडून शहराचा वातावरणीय बदलाचा अहवाल तयार करुन घेतला.

नाशिक शहराचा पर्यावरणीय बदल अहवाल नूकताच प्रकाशित झाला असून त्यात अनेक धोक्यांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी मनपा पर्यावरण विभाग क्लायमेट सेल उभारणार असून त्याद्वारे शहरासाठी धोक्यांची घंटा दर्शविण्यात आलेल्या मुद्यावर काम करुन हा धोका कमी कसा होईल यासाठी काम करणार आहे. त्यात शहरातील पर्यावरण प्रेमीनांही समाविष्ट करुन घेतले जाणार आहे.

ग्लोबल वार्मिंगने जगासाठी धोक्याची घंटा वाजवली असून सर्वच देश कार्बन उत्जर्नासह प्रदूषण पातळी कशी कमी करता येईल त्यावर अॅक्शन प्लॅन तयार करत आहे. नूकताच नाशिक महापालिकेने पर्यावरण विभागाकडून शहराचा वातावरणीय बदलाचा अहवाल तयार करुन घेतला. दोन दिवसांपुर्वी त्याचे मनपा आयुक्तांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यात शहराचा वातावरणात कमालीचा बदल झाला असून अनेक धोक्याकडे लक्ष वेधले आहे. त्यात वाढते तापमान, वाहनांची संख्या भरमसाठ वाढल्याने मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होत आहे. नदी पात्रात मोठ्या प्रमाणात बांधकाम अतिक्रमणामुळे पूराचा धोका वाढला आहे. शहरातील वाढत्या जल उपस्यामुळे भूजल पातळीत कमालीची घट झाली आहे, मोठ्या प्रमाणात प्लास्टिक व ई कचरा निर्माण होत असून त्याची शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावली जात नसणे, मागील काही वर्षात मान्सूनचा घटता आलेख यांसह अनेक समस्यांवर प्रकर्षाने झोत टाकण्यात आला आहे. या समस्यांवर वेळीच काम केले नाही तर शहरातील पर्यावरणाचा तोल पूर्णत: ढासळेल व नागरिकांसाठी जगणे मुश्किल होईल असे स्पष्ट सांगण्यात आले. त्यानंतर मनपा खडबडून जागी झाली असून पर्यावरण विभाग क्लायमेट सेल उभारणार आहे. त्यात पर्यावरण तज्ज्ञांचा समावेश असेल. भुजल पातळी वाढवणे, सौर उर्जेचा वापर करणे, वृक्षांची लागवड, पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर, नदी प्रदूषण मुक्त करुन प्रवाहित करणे, कचर्‍याची विल्हेवाट यांसह विविध मुद्यांवर काम केले जाणार असून धोक्याची पातळी कमी केली जाईल.

शहराचा पर्यावरण अहवालाचे प्रकाशन झाले असून वातावरणीय बदल व त्यावर उपाय योजना यासाठी मनपा क्लायमेट सेल उभारणार आहे. पुढिल काळात अॅक्शन प्लॅन तयार करुन काम केले जाईल.
– विजयकुमार मुंडे, उपायुक्त पर्यावरण विभाग मनपा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी