33 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक पोलिसांच्या यशस्वी मध्यस्थीने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आंदोलन मागे

नाशिक पोलिसांच्या यशस्वी मध्यस्थीने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आंदोलन मागे

अंबड औद्योगिक वसाहतीत प्रकल्पग्रस्तांना नोकरीसाठी प्राधान्य देणार या सह इतर मागण्या बाबत आयमा कडून सकारात्मक आश्वासन मिळाल्याने साखळी उपोषण मागे घेतले असल्याची माहिती समितीद्वारे कळविण्यात आले आहे. दरम्यान अंबड चुंचाळे एमआयडीसी चे पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे यांची मध्यस्थी यशस्वी झाली.अंबड मॅन्युफॅक्चर असोसिएशन व निमा या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात अंबड औदयोगिक वसाहतीतील आयमा क्रिएशन सेंटर येथे अंबड प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्या विविध मागण्या व मनमानी कारभाराबाबत बुधवार पासून प्रकल्पग्रस्त शेतकरी बचाव संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली साखळी उपोषण करणार होते.

परंतू दरम्यान अंबड चुंचाळे एमआयडीसी पोलिस चौकीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी आंदोलनकर्ते यांची भेट घेऊन तुमच्या मागण्या संदर्भात आयमा पदाधिकारी यांच्या समवेत एमआयडीसी चौकीत मिटीग आयोजित करून आंदोलनकर्ते यांचे मन परिवर्तन घडवून आणले. या नंतर पोलिस चौकी येथे प्रकल्पग्रस्त शेतकरी बचाव संघर्ष समितीचे साहेबराव दातीर, शांताराम फडोळ, गोकूळ दातीर, महेश दातीर,शरद कर्डीले सह शेतकरी तसेच आयमाचे अध्यक्ष ललीत बूब, उपाध्यक्ष उमेश कोठावदे, सरचिटणीस प्रमोद वाघ यांच्यात बैठक झाली. या वेळी साहेबराव दातीर यांनी शेतकरी उद्योजकांना आयमा चे सदस्य करून घेणे, प्रकल्पग्रस्त शेतकरी यांना औद्योगिक वसाहतीतील कंपन्यामध्ये नोकरीसाठी प्राधान्या देण्यात आले पाहिजे. काही कंपन्या रसायनयुक्त पाणी रस्त्यालगत असलेल्या गटारीत सोडत असल्याने शेती चे नुकसान होऊन नापिक झाले आहे. तर औदयोगिक वसाहतीत प्रकल्पग्रस्त शेतकरी यांना नोकरी साठी मदत केली जाईल. तसेच आयमाच्या घटनेत बसणारे शेतकरी उद्योजकांना सभासद करून घेतले जाईल. तसेच रसायनयुक्त पाणी सोडणाऱ्या कंपनीची माहिती आयमा कडे द्यावी. यासह इतर मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याने साखळी उपोषण आंदोलन स्थगित करण्यात आले. अशी माहिती प्रकल्पग्रस बचाव समितीने यावेळी दिली. त्यावेळी मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त बचाव समितीचे सदस्य शेतकरी उपस्थित होते .

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी