31 C
Mumbai
Thursday, December 5, 2024
Homeमनोरंजनआवाजाच्या दुनियेतील बादशहा; ज्याच्या आवाजाने भारतातले रस्तेही होत होते स्तब्ध! 

आवाजाच्या दुनियेतील बादशहा; ज्याच्या आवाजाने भारतातले रस्तेही होत होते स्तब्ध! 

रेडिओ म्हटलं की, पहिलं नाव येतं ते म्हणजे अमीन सयानी! त्यांच्या आवाजाची जादू फक्त भारतातच नव्हे, तर दक्षिण आशियामध्ये पसरलेली होती. त्या काळात मनोरंजनाच्या दुनियेत एखाद्या नव्या गाण्याची कॅसेट किंवा अल्बम आली आणि त्याची ओळख रेडिओवरून अमीन सयानींनी केली की, त्याची विक्री रेकाॅर्ड ब्रेक व्हायची. सयानी एखाद्या सुपरस्टारपेक्षाही कमी नव्हते. त्यांच्या आवाजाची मधुरता ही 1952 ते 1994 च्या दरम्यान श्रोत्यांना अनुभवता आली.

अमीन सयानींचा जन्म हा मुंबईमध्ये 1932 मध्ये झाला होता. सन 1951 पासून त्यांनी मनोरंजनाच्या दुनियेत पहिलं पाऊल ठेवलं. त्यांनी आपली सुरूवात ही एका इंग्रजी ब्राॅडकास्टमधून केलेली होती. परंतु श्रोत्यांना त्याची हिंदी आणि ऊर्दू लहेजा खूपच आवडला आणि त्यांना श्रोत्यांनी डोक्यावर घेतले. त्यांचा चर्चेत राहिलेला रेडिओ शो म्हणजे ‘रेडिओ सिलोन’ 1952 मध्ये सुरू झाला आणि त्याचं प्रसारण हे कोलोंबोमधून होत होतं. त्यामुळे सयानी यांची प्रसिद्धी संपूर्ण दक्षिण आशियामध्ये झाली होती.

हे ही वाचा : नाशिकच्या सातपूर मध्ये पोलिसांनी काढली गुन्हेगारांची धिंड 

त्या काळात चित्रपटातील गाण्यांचं रेटिंग आणि रेकाॅर्ड प्लेअरची विक्री अमिन सयानींच्या रेडिओ कार्यक्रमावरच अवलंबून होती. प्रत्येक फिल्म निर्माता आणि म्युझिक कंपन्या त्यांच्या टा्ॅप पोस्ट संगीत सिडीवर लक्ष देऊन असत. सयानींची सर्वात जास्त लोकप्रिय ठरलेला ‘बिनाका गीतमाला’ या कार्यक्रमाचा पहिला भाग 3 डिसेंबर 1952 साली प्रसारित झाला होता.

सुमधूर गाण्यांच्या कार्यक्रमांना सयानींच्या आवाजाची साथ मिळाली की, संगीतप्रेमींसाठी पर्वणीच असायची. सयानींचा आवाज आणि रेडिओवरील हिंदी गाण्यांचा कार्यक्रम हा प्रवास 4 दशकांहून जास्त काळ सुरू राहिला. नंतरच्या काळात त्यांचे कार्यक्रमांमध्ये थोडेफार बदल करून 2001 ते 2003 पर्यंत ‘विविध भारती’ वरून पुन्हा प्रसारित करण्यात आले होते. हे कार्यक्रम ‘एफएम, रेडिओ सीटी आणि बीग एफएम’मधून भारतासहीत अमेरिका आणि लंडनमध्येही मोठ्या प्रमाणात ऐकले जाऊ लागले होते.

हे ही वाचा : मराठा समाजाची भाजपकडून पुन्हा एकदा फसवणूक : नाना पटोले

45 रेडिओ कार्यक्रम आणि 19 हजार जिंगल्सला आपला आवाज देऊन अमिन सयानींनी लोकांच्या हृदयात आपलं स्थान बळकट केलं होतं. आजच्या रेडिओ जाॅकींनी कितीही त्यांची नक्कल करण्याचा प्रयत्न केला, तरीही अमिन सयानींचा सुमधूर ‘बहनों और भाइयों’ टॅग तर त्यांच्याच नावावर निर्विवादपणे राहणार आहे. यासंदर्भात ते स्वतः एका मुलाखतीत सांगतात की, मी नेहमीच स्त्रीला पहिलं स्थान दिलं आहे. म्हणूनच मी नेहमी कार्यक्रमाच्या सुरूवातील ‘बहनों और भाइयों’ म्हणत होतो.

आज अमिन सयानींची संवादशैली मनोरंजनाच्या दुनियेत पाऊल ठेवणाऱ्या प्रत्येकासाठी मार्गदर्शक  ठरते. अभिनेते शेखर सुमन असो की, जावेद जाफरी या सर्वांनी अमिन सयानींच्या आवाजाची नक्कल केली. नव्या पिढीमध्ये त्यांच्या आवाजाचा प्रभाव दिसून येतो, त्यामुळे प्रसिद्ध काॅमेडियन कपील शर्माही त्यांच्या आवाजाची नक्कल करताना दिसतो.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी