33 C
Mumbai
Monday, April 22, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक शिवजयंती साठी सज्ज

नाशिक शिवजयंती साठी सज्ज

आराध्य दैवत असलेले श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची १९ फेब्रुवारी रोजी जयंती आहे. तो उत्सव नाशिक शहरांमध्ये मोठ्या उत्साहात थाटामाटात साजरा करण्यात येत असुन रविवारीच नाशिक शहर ठिकठिकाणी भगवेमय झाल्याचे दिसत होते. अनेक मंडळांनी भव्य स्टेज उभारले आहेत तर अनेक ठिकाणी विशाल मूर्ती नागरिकाचे लक्ष वेधून घेत आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने पंचवटी कारंजा या ठिकाणी श्रीराम मंदिराचा देखावा उभारण्यात आलेला आहे . भद्रकाली गजानन चौक येथे भव्य श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे बॅनर लावण्यात आलेले आहे तसेच महाराष्ट्र राज्याचा नकाशा लावुन त्यावरती छत्रपती शिवाजी महाराज विजय पताका जिंकताना दिसत आहेत.

आराध्य दैवत असलेले श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची १९ फेब्रुवारी रोजी जयंती आहे. तो उत्सव नाशिक शहरांमध्ये मोठ्या उत्साहात थाटामाटात साजरा करण्यात येत असुन रविवारीच नाशिक शहर ठिकठिकाणी भगवेमय झाल्याचे दिसत होते. अनेक मंडळांनी भव्य स्टेज उभारले आहेत तर अनेक ठिकाणी विशाल मूर्ती नागरिकाचे लक्ष वेधून घेत आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने पंचवटी कारंजा या ठिकाणी श्रीराम मंदिराचा देखावा उभारण्यात आलेला आहे . भद्रकाली गजानन चौक येथे भव्य श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे बॅनर लावण्यात आलेले आहे तसेच महाराष्ट्र राज्याचा नकाशा लावुन त्यावरती छत्रपती शिवाजी महाराज विजय पताका जिंकताना दिसत आहेत.मोदकेश्वर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे . शहरातील मेनरोड , भद्रकाली सह विविध उपनगरात शिवजयंती निमित्ताने भगवे ध्वज , विविध साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
मनपाने मिरवणूक मार्गावरील अतिक्रमणे हटवीली

सोमवारी साजरी होणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पार्श्वभुमीवर आज मनपाच्या अतिक्रमण विभागाने सुट्टी असूनही शहरातील मेनरोडसह भद्रकाली आदी भागात विशेष अतिक्रमण मोहीम राबवून मिरवणूक मार्ग मोकळा केला. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त होता. अतिक्रमण कारवाईत सुमारे दोन ट्रक साहित्य जप्त करण्यात आले.अतिक्रमण उपायुक्त नितीन नेर यांच्या आदेशानुसार विभागीय अधिकारी योगेश रकटे व राजाराम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही संयुक्त मोहीम पश्चिम व पूर्व विभाग यांनी राबवून चौक मंडई येथील वाकडी बारी ते दूध बाजार तसेच भद्रकाली ते मेन रोड व धुमाळ पॉईंट ते एमजी रोड, अशोक स्तंभ ते रविवार कारंजा पर्यंत मिरवणूक मार्ग मोकळा केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी