27 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिकमध्ये संभाजी ब्रिगेडची कॉर्पोरेट शिवजयंती

नाशिकमध्ये संभाजी ब्रिगेडची कॉर्पोरेट शिवजयंती

प्रवीण दादा गायकवाड प्रदेशाध्यक्ष असलेल्या संभाजी ब्रिगेड ने इंडिया सिक्युरिटी प्रेस च्या जिमखाना हॉल मध्ये रविवार दि १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता कॉर्पोरेट शिवजयंती साजरी करण्यात आली.शिवपुतळ्याचे व ग्रंथांचे पूजन अशोक गायधनी,महेंद्र शिंगारे,शशिकांत मोरे, विकास भागवत,धोंडीराम रायते,जिल्हाध्यक्ष संतोष गायधनी यांच्या हस्ते झाल्या नंतर कार्यक्रमात आगळ्या वेगळ्या पद्धतीने कॉर्पोरेट शिवजयंती साजरी करण्यात आली.या शिवजयंती ची चर्चा मात्र समाज माध्यमातून चांगल्या पद्धतीने चर्चिली गेल्याने शिवजयंती चे कौतुक केले गेले.सारथी आपल्या साथी ला..कुणबी,मराठा,मराठा कुणबी, कुणबी मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या,युवा पिढीच्या प्रगतीसाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था,पुणे अर्थात सारथीची स्थापना करण्यात आली आहे.

प्रवीण दादा गायकवाड प्रदेशाध्यक्ष असलेल्या संभाजी ब्रिगेड ने इंडिया सिक्युरिटी प्रेस च्या जिमखाना हॉल मध्ये रविवार दि १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता कॉर्पोरेट शिवजयंती साजरी करण्यात आली.शिवपुतळ्याचे व ग्रंथांचे पूजन अशोक गायधनी,महेंद्र शिंगारे,शशिकांत मोरे, विकास भागवत,धोंडीराम रायते,जिल्हाध्यक्ष संतोष गायधनी यांच्या हस्ते झाल्या नंतर कार्यक्रमात आगळ्या वेगळ्या पद्धतीने कॉर्पोरेट शिवजयंती साजरी करण्यात आली.या शिवजयंती ची चर्चा मात्र समाज माध्यमातून चांगल्या पद्धतीने चर्चिली गेल्याने शिवजयंती चे कौतुक केले गेले.सारथी आपल्या साथी ला..कुणबी,मराठा,मराठा कुणबी, कुणबी मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या,युवा पिढीच्या प्रगतीसाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था,पुणे अर्थात सारथीची स्थापना करण्यात आली आहे..विविध पद्धतीने सारथीमार्फत मराठा समाजातील विद्यार्थ्यांसोबतच समाजातील सर्व घटकांच्या प्रगतीसाठी,आर्थिक सक्षमीकरणासाठी व्यापक स्वरुपात उपक्रम,योजना राबवण्यात येत आहेत.या योजनांविषयीची माहिती समन्वयक शशिकांत मोरे यांनी दिली.

आयात निर्यातीमध्ये रोजगार संधी

विविध देशांत भारतीय उत्पादनांना वाढती मागणी आहे व भारतातही अनेक परदेशी उत्पादनांना चांगली मागणी आहे.आयात-निर्यात या धोरणाचे महत्त्वाचे भागधारक आणि पक्षकार तसेच आयात-निर्यात प्रक्रिया,पेमेंट सेटलमेंट व इनकोटर्म्सची आंतरराष्ट्रीय पातळीवर वापरली जाणारी पद्धत,शिपिंग, मालवाहतुकीचे दर,कंटेनर व्यवस्थापन,विदेश व्यापारातील नवीनतम जागतिक ट्रेंड आणि निर्यात ऑर्डरची भौगोलिक व्याप्ती,विपणन योजना,निर्यात सुरू करण्यापूर्वीची तयारी,कागदपत्रे,वाटाघाटी कशा कराव्यात याचे कौशल्य,पॅकेजिंग व लेबलिंगचे मानदंड,शासनाच्या विविध निर्यात योजना,निर्यातदारांसाठी डिजिटल साधने या विषयावर कारवार फार्मचे महेंद्र शिंगारे यांनी दिली.

अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा संभाजी ब्रिगेड चा विचार…
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळी त्यांनी एक संकल्पना मांडली होती,ती म्हणजे अहद तंजावर तहद पेशावर, अवघा मुलुख आपला !

जागतिकीकरणामुळे आता जग ग्लोबल झाले आहे.जगात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर उद्योग,व्यवसाय आणि नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.लॉकडाऊननंतर तर जगातल्या विविध संधी हेरण्याची आणि त्यातून आपले अर्थकारण मजबूत करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.
आजच्या काळात महाराजांची प्रेरणा आणि जगात उपलब्ध झालेल्या विविध संधी यांची सांगड घालण्याची आवश्यकता आहे.या सगळ्या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडने एक नवी दिशा,नवा विचार समाजासमोर मांडला आहे,तो म्हणजे अहद ऑस्ट्रेलिया,तहद कॅनडा,अवघा मुलुख आपला ! या बद्दल परदेशात उपलब्ध असणाऱ्या संधीची माहिती जिल्हाध्यक्ष संतोष गायधनी यांनी दिली.

प्रास्ताविक पुरुषोत्तम गोरडे,सूत्रसंचालन मंगल गायधनी यांनी केले तर आभार श्रीकांत पगार यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी उमेश भावले,तुषार मटाले,मदन गाडे,सागर आहेर,गणेश आगळे,प्रतीक ताजनपुरे,सुनील आगळे,प्रमोद गायधनी, महेंद्र धोंगडे,हेमंत कांबळे,सनी सावंत,रोशन आगळे,जयेश पाटील,प्रदीप गायधनी,तुषार दोंदे,हर्षल जगताप,सोहम गायधनी आदी पदाधिकारी यांच्या सह महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी