29 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeराजकीयआगामी लोकसभा निवडणुकीसाठी राजकिय नेत्यांसोबत क्रिकेटर आणि अभिनेतेही लोकसभा निवडणुक रिगंणात कोण...

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राजकिय नेत्यांसोबत क्रिकेटर आणि अभिनेतेही लोकसभा निवडणुक रिगंणात कोण आहेत ते 

भाजपाने अजून आपली लोकसभेची यादी जाहीर केली नसून त्या यादीमध्ये कोण कोठुन निवडणुक लढवणार असल्याचे समजणार आहे. त्यासाठी सर्वजण भाजपाच्या यादीकडे आपले डोळे लावून बसले आहेत.

राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे-वाहू लागले आहेत. मार्च महिन्या सुरु झाल्याने सर्वाचे लक्ष हे निवडणुकीच्या तारखाकडे लागले आहे. भाजपची यादी ही अंतिम टप्प्यात आली आहे. ज्यामध्ये भाजप हे लोकसभेची  १३० जागाची यादी जाहीर करणार आहेत असे सांगितले जात आहे. यामध्ये मोदी-शाहांकडून धक्कातंत्राचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. 

नाशिक मनपात पसंतीच्या विभागासाठी दोघा उप अभियत्यांची सेटींग

भाजपने यादी जाहीर होण्यापुर्वी राजकीय वर्तुळामध्ये बातमी समोर आली आहे, ज्यामध्ये आता बाॅलिवूड मधील अभिनेते ही या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे दिसत आहे. यामध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंह याचा समावेश असल्याचे सांगते. युवराज सिंह पंजाबमधील गुरदासपूर लोकसभा मतदारसंघातून कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवू शकतो. याशिवाय, बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारला भाजपकडून चंदिगड किंवा दिल्लीतील एखाद्या मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरवले जाईल. तर भाजपच्या माजी खासदार आणि अभिनेत्री जयाप्रदा यांना दक्षिण भारतामधील एखाद्या मतदारसंघातून निवडणुकीचे तिकीट दिले जाईल, अशी माहिती आहे.

नाशिक मनपा पेस्ट कंट्रोल ठेक्यासाठी तीन ठेकेदार शर्यतीत

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत काय ठरले?

दिल्लीत २९ फेब्रुवारीला भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली होती. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. ही बैठक रात्री उशीरापर्यंत सुरु होती. या बैठकीअंती भाजपच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी लवकरात लवकर जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पहिल्या यादीत भाजपच्या सामर्थ्यशाली नेत्यांचा समावेश असेल. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची नावे असू शकतात. या प्रमुख नेत्यांशिवाय भाजपकडून काही सेलिब्रिटींना उमेदवारी देऊन लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने जोरदार वातावरणनिर्मिती केली जाऊ शकते. 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी