35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ 31 टक्केच पाणीसाठा शिल्लक

नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ 31 टक्केच पाणीसाठा शिल्लक

उन्हाच्या तीव्रतेसह पाणी टंचाईचे चटके सर्वत्र जाणवत असताना जिल्ह्यातील धरणसाठा वेगाने कमी होत असून एप्रिलच्या प्रारंभी लहान-मोठ्या २३ धरणांमध्ये ( Dam ) २० हजार ५६१ दशलक्ष घनफूट म्हणजे केवळ ३१.३१ टक्के जलसाठा शिल्लक(31 per cent water stock) आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १५ टक्के कमी जलसाठा आहे. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूरमध्ये ४७ टक्के जलसाठा आहे.पावसाअभावी यंदा धरणे पूर्ण क्षमतेने भरली नाहीत. समन्यायी तत्वावर पाणी वाटपाच्या सूत्राने जिल्ह्यातील काही धरणांमधून मराठवाड्यातील जायकवाडीसाठी पाणी द्यावे लागले होते. एकूण गरज वाढत असताना जलसाठ्याचे घटते प्रमाण यंदाचा चिंतेचा विषय ठरला आहे.(Only 31 per cent water stock is left in dams in Nashik district)

गतवर्षीपेक्षा 10 हजार दशलक्ष घनफूट जलसाठा कमी:
धरणांतील जलसाठ्याचे घटते प्रमाण सध्या चिंतेचा विषय बनला आहे. चालू वर्षी एक-दोन धरणांचा अपवाद वगळता जवळपास सर्वच धरणांतील साठा निम्म्याहून कमी झाला आहे.
गेल्या वर्षीचा विचार करता यंदा धरणांमध्ये १० हजार दशलक्ष घनफूट इतका कमी जलसाठा आहे.गतवर्षी एप्रिसच्या प्रारंभी धरणांमध्ये ३० हजार ५४० दशलक्ष घनफूट (४६.५१ टक्के) जलसाठा होता. एक-दोन धरणांचा अपवाद वगळता जवळपास सर्वच धरणांतील जलसाठा निम्याहून कमी झाला आहे. पालखेडमध्ये (६१ टक्के) व नांदूरमध्यमेश्वर बंधारा (९८) हे वगळता कुठल्याही धरणात ५० टक्क्यांपेक्षा जास्त जलसाठा नाही. काश्यपीमध्ये ८४४ दशलक्ष घनफूट (४५), गौतमी गोदावरी ७०२ (३७), आळंदी ३०४ (३७), करंजवण (१३२५ (२४), ओझरखेड ४४९ (२१), दारणा १७६० (२४), मुकणे २२२१ (३०), वालदेवी ४८१ (४२), चणकापूर ७११ (२९), हरणबारी ४५५ (३९), गिरणा ५७९० (३१), पुनद ९९९ दशलक्ष घनफूट (७६ टक्के) असा जलसाठा आहे.

कुठल्या धरणात किती साठा?
पालखेड धरणात (61 टक्के) व नांदूरमध्यमेश्वर बंधारा (98) वगळता कोणत्याही धरणात 50 टक्क्यांपेक्षा जास्त जलसाठा नाही. काश्यपीत 844 दशलक्ष घनफूट (45 टक्के), गौतमी गोदावरी 702 (37 टक्के), आळंदी 304 (37 टक्के), करंजवण 1,325 (24 टक्के), ओझरखेड 449 (21 टक्के), दारणा 1,760 (24 टक्के), मुकणे 2,221 (30 टक्के), वालदेवी 481 (42 टक्के), चणकापूर 711 (29 टक्के), हरणबारी 455 (39 टक्के), गिरणा 5,790 (31 टक्के), पुनद 999 दशलक्ष घनफूट (76 टक्के) असा जलसाठा शिल्लक आहे.

आठ धरणांमध्ये पाणी कमी:
नागासाक्या धरण आधीपासून कोरडेठाक आहे. या पाठोपाठ पुणेगाव (०.८०), तिसगाव (पाच टक्के) धरणांची त्या दिशेने वाटचाल सुरू आहे. वाघाड (१९ टक्के), ओझरखेड (२१), भावली (१३), कडवा (२१), केळझर (१७), माणिकपूज (११) असा जलसाठा आहे. आठ धरणांमध्ये तुलनेत कमी जलसाठा आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी