33 C
Mumbai
Monday, April 22, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक सातपूरला "मॉर्निंग वॉक विथ पोलीस" उपक्रमात पोलिसांनी साधला नागरिकांशी थेट संवाद

नाशिक सातपूरला “मॉर्निंग वॉक विथ पोलीस” उपक्रमात पोलिसांनी साधला नागरिकांशी थेट संवाद

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या "मॉर्निंग वॉक विथ पोलिस" उपक्रमाच्या पहिल्याच दिवशी शनिवारी (ता. २४) सातपूर इएसआय जॉगिंग ट्रॅकवर सातपूरकरांनी पोलिसांसमोर डझनभर समस्यांचा पाढा वाचला. दरम्यान, आठवड्याभरात समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहम माछरे यांनी दिले.पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून शनिवारपासून (ता. २४) शहरातील सर्वच जॉगिंग ट्रॅकवर "मॉर्निंग वॉक विथ पोलिस" उपक्रमास सुरुवात करण्यात आलीआहे. त्याच पार्श्वभूमीवर सातपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहम माछरे यांनी शनिवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास इएसआय जॉगिंग ट्रॅकवर नागरिकांसोबत वॉक करत संवाद साधला.

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या “मॉर्निंग वॉक विथ पोलिस” उपक्रमाच्या पहिल्याच दिवशी शनिवारी (ता. २४) सातपूर इएसआय जॉगिंग ट्रॅकवर सातपूरकरांनी पोलिसांसमोर डझनभर समस्यांचा पाढा वाचला. दरम्यान, आठवड्याभरात समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहम माछरे यांनी दिले.पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून शनिवारपासून (ता. २४) शहरातील सर्वच जॉगिंग ट्रॅकवर “मॉर्निंग वॉक विथ पोलिस” उपक्रमास सुरुवात करण्यात आलीआहे. त्याच पार्श्वभूमीवर सातपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहम माछरे यांनी शनिवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास इएसआय जॉगिंग ट्रॅकवर नागरिकांसोबत वॉक करत संवाद साधला.

यावेळी संध्याकाळच्या सुमारास जॉगिंग ट्रॅकवर टवाळखोर दारू पिण्यास बसतात, परिसरातील महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना, झाडांना व ट्रॅकवर पाणी मारले जात नाही, केअरटेकरचा निष्काजीपणा, औद्योगिक वसाहतीत रस्ताच्या कडेला बेशिस्त पार्किंग, विभागातील विविध शाळेभोवती टवाळखोरांचा उच्छाद, बुलेट सायलन्सरचा कर्णकर्कश आवाज, (दामिनी) महिला पथकांची संख्या वाढवणे आदि समस्या मांडण्यात आल्या.
दरम्यान, श्रमिकनगर परिसरातून गुंडांची धिंड काढत केलेल्या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले असून यापुढेही अशाच प्रकारे टवाळखोर व गुंडांची धिंड काढण्याच्या सूचना नागरिकांनी केल्या. यावेळी दिलीप कटारे, नाना वाघ, गोकुळ भदाणे, काळू काळे, बजरंग शिंदे, दिलीप कटारे, अरुण काळे, दिगंबर निगळ, ज्ञानेश्वर नहीरे, शशी दातीर, सुधाकर शिशोदे, शंकर देवघरे आदीसह जॉगर्स उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी