31 C
Mumbai
Thursday, December 5, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक शेतीला नवतंत्रज्ञानाची जोड दिल्यास उत्पादनात वाढ-छगन भुजबळ

नाशिक शेतीला नवतंत्रज्ञानाची जोड दिल्यास उत्पादनात वाढ-छगन भुजबळ

अनिश्चित पर्जन्यमान, हवामान बदल व वाढती लोकसंख्या यांचा विचार करता अन्नधान्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतीत नवनवीन बदल, शेतीपूरक व्यवसाय करतानाच शेतीला नवतंत्रज्ञानाची जोड दिली पाहिजे. त्यासाठी बळीराजा कृषी प्रदर्शनाचा फायदा होईल. कारण या माध्यमातून शेतकऱ्यांना एकाच छताखाली विविध नवप्रयोगांची माहिती मिळणार आहे, असा विश्वास राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.मनमाड कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित बळिराजा कृषि प्रदर्शनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.कृषि उत्पन्न बाजार समिती, मनमाड येथे आयोजित या कार्यक्रमास माजी आमदार जगन्नाथ धात्रक,पंकज भुजबळ,गणेश धात्रक आदि उपस्थित होते.

अनिश्चित पर्जन्यमान, हवामान बदल व वाढती लोकसंख्या यांचा विचार करता अन्नधान्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतीत नवनवीन बदल, शेतीपूरक व्यवसाय करतानाच शेतीला नवतंत्रज्ञानाची जोड दिली पाहिजे. त्यासाठी बळीराजा कृषी प्रदर्शनाचा फायदा होईल. कारण या माध्यमातून शेतकऱ्यांना एकाच छताखाली विविध नवप्रयोगांची माहिती मिळणार आहे, असा विश्वास राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.मनमाड कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित बळिराजा कृषि प्रदर्शनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.कृषि उत्पन्न बाजार समिती, मनमाड येथे आयोजित या कार्यक्रमास माजी आमदार जगन्नाथ धात्रक,पंकज भुजबळ,गणेश धात्रक माजी पणन संचालक सुनील पवार,विजय पाटील, जिल्हा बँकेचे माजी संचालक चंद्रकांत गोगड, ॲड. गंगाधर बिडगर, राजेंद्र भोसले, बाजार समिती सभापती दीपक गोगड, दर्शन आहेर आदि उपस्थित होते.

टक म्हणून ते बोलत होते.
आता सगळ्या गोष्टी आता मोबाईलवर उपलब्ध होत असून, या माध्यमातून अद्ययावत कृषि तंत्रज्ञान आत्मसात करावे, असे सांगून मंत्री छगन भुजबळ म्हणाले, शासनाच्या योजनाची माहिती व लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. भूविकास बँकेकडचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले. विविध योजनांचा आर्थिक लाभ दिला आहे. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी अनुदान शासनाच्या वतीने देण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मनमाडमधील कृषि प्रदर्शन अतिशय चांगला उपक्रम असून, प्रत्येक तालुक्यात, बाजार समितीत कृषि प्रदर्शन भरवले पाहिजे, असे सांगून मंत्री छगन भुजबळ म्हणाले, प्रदर्शनाच्या माध्यमातून नवनवीन अवजारे, आधुनिक कल्पना येत असतात. संपूर्ण महाराष्ट्रात नाशिकचे शेतकरी हे प्रयोगशील आहेत. बिन पाण्याची शेती, हळदीचे प्रयोग आपल्याकडे केले गेले. अशाच पद्धतीने मेहनत करून नवनवीन संकल्पना शेतकऱ्यांनी राबवाव्यात. तसेच पाणी जपून वापरले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

मंत्री छगन भुजबळ म्हणाले, कांद्याला भाव मिळाला त्यामुळे कांदा उत्पादन वाढले. मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात शेतकऱ्यांना भाव मिळेल. त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजेत, असे ते म्हणाले. तसेच, बाजार समितीतील हमाल मापारी, शेतकरी यांना सुविधा पुरवाव्यात असे त्यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी