30 C
Mumbai
Thursday, May 23, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षितेसाठी पोलीस गृहभेटीला

ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षितेसाठी पोलीस गृहभेटीला

मानवी जीवनाच्या अर्ध्या टप्प्यावर आयुष्याचा लेखाजोखा मांडत असताना प्रेम, आपुलकी, स्नेह, आत्मीयता, आदर व ईश्वर भक्ती याची आस लागलेली असताना भावनांचा होणारा कोंडमारा सहन करत जीवन जगताना अनेक ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यात असंख्य अडचणी येतात. अशा कठीण प्रसंगी पोलीस दलाकडून होणारी आपुलकीची विचारणा ज्येष्ठ नागरिकांसाठी निश्चितच सुखद मानला जात आहे. समाजात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या पोलीस यंत्रणेने ज्येष्ठ नागरिकांच्या गृहभेटीला सातपूर पोलिसांनी प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे.

मानवी जीवनाच्या अर्ध्या टप्प्यावर आयुष्याचा लेखाजोखा मांडत असताना प्रेम, आपुलकी, स्नेह, आत्मीयता, आदर व ईश्वर भक्ती याची आस लागलेली असताना भावनांचा होणारा कोंडमारा सहन करत जीवन जगताना अनेक ज्येष्ठ नागरिकांना (senior citizens) आयुष्यात असंख्य अडचणी येतात. अशा कठीण प्रसंगी पोलीस दलाकडून होणारी आपुलकीची विचारणा ज्येष्ठ नागरिकांसाठी निश्चितच सुखद मानला जात आहे. समाजात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या पोलीस यंत्रणेने ज्येष्ठ नागरिकांच्या (senior citizens) गृहभेटीला सातपूर पोलिसांनी (satpur police) प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे.(Police visit homes for safety of senior citizens)

सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांनी पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात येणाऱ्या विविध भागांतील ज्येष्ठ नागरिकांच्या गृहभेटीस सुरुवात केली आहे. स्थानिक पोलीस नियमित ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्यांचे निराकारण करत आहेत. सोमवारी सायंकाळी अशोकनगर येथील ज्येष्ठ नागरिकांची बैठक घेण्यात आली. बैठकीत ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, अडीअडचणी, तक्रारी जाणून घेत त्यांचे तक्रारींचे निराकरण करत टवाळखोरांवर कारवाई करण्याबाबत आश्वासन देण्यात आले.

दरम्यान, अचानक काही समस्या उद्भवल्यास मदतीसाठी 112 या नंबरवर कॉल करणे, बाहेरगावी जाताना शेजारी राहणाऱ्यांना घरावर लक्ष ठेवण्यास सांगणे. ज्येष्ठ वयोवृद्ध महिलांना आपले दागदागिने संभाळणेबाबत सूचना देण्यात आल्या. यावेळी 30 ते 35 ज्येष्ठ नागरिक बैठकीस हजर होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी