26 C
Mumbai
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक उड्डाण पुलावर ट्रकला लागलेल्या आगीत बटाटे जळून खाक

नाशिक उड्डाण पुलावर ट्रकला लागलेल्या आगीत बटाटे जळून खाक

नाशिक येथून मुंबईच्या दिशेने बटाटे घेऊन जाणाऱ्या ट्रकला उड्डाण पुलावरील लेखा नगर भागात आग लागल्याचा प्रकार घडला. तात्काळ अग्निशमन विभागाने घटनास्थळी दाखल होत अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवले विशेष म्हणजे उड्डाण पुलावर अचानक ट्रकला आग लागल्यामुळे दोन्हीही बाजूला पूर्णतः वाहतुकीची कोंडी झाल्याचे चित्र दिसले. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे पथक अग्निशमन विभाग यांनी काही वेळात ट्रक बाजूला करून वाहतुकीची कोंडी सुरळीत केली. याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक येथून मुंबईच्या दिशेने उड्डाण पुलावरून जाणारा ट्रक क्रमांक (UP 75 AT 9393) जात असताना सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास लेखानगर भागात अचानक ट्रकच्या पाठीमागील टायरला आग लागली, आणि काही वेळातच ट्रकची मागील बाजू पूर्णतः जळू लागली.

ट्रकला लागलेली आग इतकी भीषण होती की, आजूबाजूला तब्बल पाचशे ते सहाशे मीटर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे उड्डाण पुलावर काही वेळासाठी वाहतुकीची कोंडी झाल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे पथक तसेच अग्निशमन विभागाचा बंब घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. यानंतर अर्ध्या तासात आग विझवण्यात अग्निशमन विभागाच्या जवानांना यश आले. ट्रक मधील बटाटा व इतर साहित्याचे नुकसान झाले आहे. आग बघण्यासाठी लेखानगर तसेच कमोदनगर परिसरातील सर्विस रोडवर देखील वाहन चालकांनी मोठी गर्दी केली होती. सदर ट्रकला आग कशामुळे लागली बाबतची माहिती अद्याप पर्यंत समजू शकली नाही. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसून ट्रक मधील चालक व क्लीनर हे सुदैवाने बचावले.

दरम्यान आगीचे कारण शोधण्यासाठी नागरिकांनी सिडको अग्निशमन दल व अंबड पोलीस ठाणे येथील लँडलाईन वर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता दोन्हीही लँडलाईन नंबर लागत नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्या आहेत. सदर तक्रारी या नेहमीच्या असून संबंधित लँडलाईन फोन का लागत नाही. याबाबतचे उत्तर मात्र आद्यपर्यंत मिळू शकलेले नाही. जर अशीच आपाबिती भविष्यात होऊ लागली आणि आपत्कालीन परिस्थिती उद्भवली आणि हे नंबर लागत नसतील तर भविष्यात एखादी मोठी दुर्घटना झाल्यास त्याला जबाबदार कोण ? याबाबतचा प्रश्न नागरी विचारताना दिसत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी