31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक आश्वासनानंतर प्रहारचे उपोषण मागे

नाशिक आश्वासनानंतर प्रहारचे उपोषण मागे

रेल्वे मालधक्का येथे प्रहार संघटनेने विविध मागण्याकरिता बेमुदत उपोषण पुकारले होते. चौथ्या दिवशी कामगार उपायुक्त बिरार यांनी मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्यानंतर प्रहारचे जिल्हाध्यक्ष शरद शिंदे यांच्या मध्यस्थीतीने उपोषण स्थगीत केले.प्रहार कामगार संघटनेला दोन बॉक्स व साठ नोंदणीकृत फॉर्म देण्याचे ठरले होते. मात्र अद्यापपावेतो कुठली ही नोंदणी झाली नाही.तसेच दोन बॉक्स ही मिळाले नाही.याविरोधात प्रमोद सोनकांबळे यांनी माजी मंत्री बच्चू कडू यांच्या आदेशाने उपोषनाचे हत्यार उपसले. दरम्यान मंगळवारी (दि.27) दुपारी चार वाजता सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यासमवेत बैठक झाली.

रेल्वे मालधक्का येथे प्रहार संघटनेने विविध मागण्याकरिता बेमुदत उपोषण पुकारले होते. चौथ्या दिवशी कामगार उपायुक्त बिरार यांनी मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्यानंतर प्रहारचे जिल्हाध्यक्ष शरद शिंदे यांच्या मध्यस्थीतीने उपोषण स्थगीत केले.

प्रहार कामगार संघटनेला दोन बॉक्स व साठ नोंदणीकृत फॉर्म देण्याचे ठरले होते. मात्र अद्यापपावेतो कुठली ही नोंदणी झाली नाही.तसेच दोन बॉक्स ही मिळाले नाही.याविरोधात प्रमोद सोनकांबळे यांनी माजी मंत्री बच्चू कडू यांच्या आदेशाने उपोषनाचे हत्यार उपसले. दरम्यान मंगळवारी (दि.27) दुपारी चार वाजता सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यासमवेत बैठक झाली. यावेळी प्रहार कामगार संघटनेला मालधक्का बाहेरील गोडाऊन गॅस गोडाऊन व सिमेंट गोडाऊनसह इतर जिथे माथाडी लागू आहे. असे कामे देण्याचे ठरले. यास सर्व युनियनने सहमती दर्शवली. यावेळी उपजिल्हाप्रमुख अमजद पठाण, उत्तर महाराष्ट्र प्रमुख दत्तू बोडके, रामभाऊ पठारे, भारत निकम, हिरामण तेलोरे, रवी मोकळ,प्रभाकर रोकडे,राजू मोकळ, दीपक वाघ, सुभाष अहिरे, राजू अहिरे ,मिलिंद वाघ, कमलाकर शेलार, वैशालीताई अनवट, सीमाताई पवार आदी पदाधिकारी उपस्थित होतेे. प्रहारचे जिल्हाप्रमुख शरद शिंदे यांनी सर्वांचे आभार मानत उपोषण मागे घेतल्याचे जाहीर केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी