28 C
Mumbai
Saturday, April 13, 2024
Homeक्रिकेटनाशिक हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफी स्पर्धा संपन्न नासिक क्रिकेट अकादमीला...

नाशिक हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफी स्पर्धा संपन्न नासिक क्रिकेट अकादमीला विजेतेपद

नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित मेसन ट्रेडर्स व मेसन डेव्हलपर्स पुरस्कृत, १६ वर्षांखालील वयोगटातील हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफीचे विजेतेपद नासिक क्रिकेट अकादमी संघाने मिळवले. अंतिम फेरीच्या सामन्यात नासिक क्रिकेट अकादमी संघाने , शेखर घोष क्रिकेट अकादमी संघावर ६ गडी राखून विजय मिळवत हि स्पर्धा जिंकली.महात्मा नगर क्रिकेट मैदानावर झालेल्या झालेल्या ५० षटकांच्या सामन्यात अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या शेखर घोष क्रिकेट अकादमीने ४० षटकांत १०२ धावा केल्या. सलामीवीर आरुष रकटेने सर्वाधिक २४ , कृष्णा बोरस्तेने १८ , जुगेश यादवने ११ व देवांश गवळीने हि नाबाद ११ धावा केल्या.

नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित मेसन ट्रेडर्स व मेसन डेव्हलपर्स पुरस्कृत, १६ वर्षांखालील वयोगटातील हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफीचे विजेतेपद नासिक क्रिकेट अकादमी संघाने मिळवले. अंतिम फेरीच्या सामन्यात नासिक क्रिकेट अकादमी संघाने , शेखर घोष क्रिकेट अकादमी संघावर ६ गडी राखून विजय मिळवत हि स्पर्धा जिंकली.महात्मा नगर क्रिकेट मैदानावर झालेल्या झालेल्या ५० षटकांच्या सामन्यात अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या शेखर घोष क्रिकेट अकादमीने ४० षटकांत १०२ धावा केल्या. सलामीवीर आरुष रकटेने सर्वाधिक २४ , कृष्णा बोरस्तेने १८ , जुगेश यादवने ११ व देवांश गवळीने हि नाबाद ११ धावा केल्या.नासिक क्रिकेट अकादमी तर्फे ज्ञानदीप गवळी व मंथन पिंगळेने प्रत्येकी २ तर रोहन शिरभाते , सायुज्य चव्हाण , अर्जुन साळुंके व आर्यन घोडके यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

विजयासाठीच्या १०३ धावा, नासिक क्रिकेट अकादमी संघाने कर्णधार ऋग्वेद जाधव नाबाद २८, ज्ञानदीप गवळीहि २८ व आर्यन घोडके १३ यांच्या फलंदाजीच्या जोरावर २६ .१ षटकांतच पार करत ६ गडी राखून विजय मिळवत , १६ वर्षांखालील वयोगटातील हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफीचे विजेतेपद मिळवले. शेखर घोष क्रिकेट अकादमीच्या अंजन आवारेने ३ तर व्यंकटेश बेहरेने १ गडी बाद केला.

या हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफी स्पर्धेत १६ वर्षांखालील वयोगटात ४ गटातील १६ संघांत एकूण २७ सामने खेळवण्यात आले. फलंदाजीत फ्रावशी क्रिकेट अकादमीचा जिबान छेत्री याने ३ सामन्यात एकूण सर्वाधिक ३१९ धावा फटकावल्या. तर गोलंदाजीत निवेकच्या चिन्मय भास्करने ४ सामन्यात सर्वाधिक १६ बळी घेत चमक दाखवली . यष्टी मागे नासिक क्रिकेट अकादमीच्या तन्मय जगतापने ५ सामन्यात सर्वाधिक ११ गडी टिपले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी