28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रपुण्यश्लोक सदगुरू शिवपार्वती प्रतिष्ठानचे सन २०२४ चे पुरस्कार जाहीर

पुण्यश्लोक सदगुरू शिवपार्वती प्रतिष्ठानचे सन २०२४ चे पुरस्कार जाहीर

येथील पुण्यश्लोक सदगुरू शिवपार्वती प्रतिष्ठान यांच्यावतीने पुण्यश्लोक मातोश्री पार्वतीबाई गोसावी यांच्या ४६ व्या वार्षिक स्मृतिदिन समारोह निमित्ताने देण्यात येणारे पुरस्कार जाहीर झाले असून पुण्यश्लोक सदगुरू शिवपार्वती अध्यात्मिक पुरस्कार प. पू. जगतगुरू विठ्ठलनाथ द्वाराचार्य विद्यावाचस्पती डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर, लहवित, जिल्हा नाशिक यांना, तर श्रीराम पराडकर वैदिक पुरस्कार वे. मु. वामन पुंडलिक हळबे, नाशिक यांना, नंदलाल जोशी वेदवेदांग पुरस्कार वे. मु. डॉ. नरेंद्र धारणे, नाशिक, यांना, तर सर डॉ. मो. स. तथा आप्पासाहेब गोसावी लोकसेवक पुरस्कार श्री. सी. आर. पाटील, मांगीतुंगी ताहाराबाद, नाशिक यांना तर डॉ. सौ. सुनंदा गोसावी संगीतरत्न पुरस्कार श्री. नितीन वारे, प्रख्यात तबलावादक, नाशिक यांना जाहीर झाले असून आदर्श संस्था पुरस्कार नाशिक येथील जनजाती कल्याण आश्रम, गुही ता. सुरगाणा, जि. नाशिक, या संस्थेला प्राप्त झाला आहे.

येथील पुण्यश्लोक सदगुरू शिवपार्वती प्रतिष्ठान यांच्यावतीने पुण्यश्लोक मातोश्री पार्वतीबाई
गोसावी यांच्या ४६ व्या वार्षिक स्मृतिदिन समारोह निमित्ताने देण्यात येणारे पुरस्कार जाहीर झाले असून
पुण्यश्लोक सदगुरू शिवपार्वती अध्यात्मिक पुरस्कार प. पू. जगतगुरू विठ्ठलनाथ द्वाराचार्य विद्यावाचस्पती डॉ.
रामकृष्णदास महाराज लहवितकर, लहवित, जिल्हा नाशिक यांना, तर श्रीराम पराडकर वैदिक पुरस्कार वे. मु.
वामन पुंडलिक हळबे, नाशिक यांना, नंदलाल जोशी वेदवेदांग पुरस्कार वे. मु. डॉ. नरेंद्र धारणे, नाशिक, यांना, तर
सर डॉ. मो. स. तथा आप्पासाहेब गोसावी लोकसेवक पुरस्कार श्री. सी. आर. पाटील, मांगीतुंगी ताहाराबाद,
नाशिक यांना तर डॉ. सौ. सुनंदा गोसावी संगीतरत्न पुरस्कार श्री. नितीन वारे, प्रख्यात तबलावादक, नाशिक
यांना जाहीर झाले असून आदर्श संस्था पुरस्कार नाशिक येथील जनजाती कल्याण आश्रम, गुही ता. सुरगाणा, जि.
नाशिक, या संस्थेला प्राप्त झाला आहे.
तसेच वैदेही सर्जनशीलता पुरस्कार नाशिक येथील कु. गौतमी वाघ यांना
जाहीर झाला असून, बुधवार दि. २८ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ०६:३० ते ०८:३० या दरम्यान पलाश
हाँल, गुरुदक्षिणा इमारत, प्रि. टी. ए. कुलकर्णी विद्यानगर, कॉलेज रोड, नाशिक येथे या पुरस्कारांचा वितरण
समारंभ प. पू. स्वामिनी स्थितप्रज्ञानंद सरस्वती, फुलगाव, पूणे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख उपस्थितीत संपन्न
होणार आहे. अशी माहिती संस्थेचे सचिव श्री. कल्पेश गोसावी यांनी दिली आहे.
ह्या प्रसंगी अनुबंधी सोहळ्याचे आयोजन केले असून १) सौ. रश्मी व श्री. राजेंद्र भट, जेष्ठ कृषितज्ञ
बदलापूर, अंबरनाथ २) सौ. अनघा व श्री. अजित चिपळूणकर समाजसेवाव्रती, नाशिक ३) सौ. ज्योती व डॉ. श्री
राजीव गाडगीळ ख्यातनाम दंतचिकित्सक, नाशिक ४) डॉ. सौ. नीलम व श्री. मुकुंद बोकील शिक्षणतज्ञ, नाशिक ५)
अॅड. सौ. अपर्णा व श्री. शैलेश कुलकर्णी विख्यात उद्योजक, नाशिक, यांचा अनुबंधी सोहळ्यात सत्कार करण्यात
येणार आहे. या प्रसंगी लेखक डॉ. उल्हास रत्नपारखी ह्यांच्या श्री. ज्ञानेश्वरीतील मंगलाचरणे भाग -२ [शिवज्योती
विशेषांक] ह्या ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
ह्या प्रसंगी श्री. कल्पेश गोसावी व श्री. वि. वा. लक्ष्मीकांत जोशी यांनी संपादित केलेल्या सर डॉ. मो. स.
तथा अप्पासाहेब गोसावी स्मृतिग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
ह्या कार्यक्रमात गुणवंत व प्रज्ञावंतांना विशेष पुरस्कारने मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. या
कार्यक्रमाच्या निमित्ताने रविवार दि. २५फेब्रुवारी २०२४ ते बुधवार दि. २८ फेब्रुवारी २०२४ पर्यंत दररोज
सायंकाळी ६: ३० ते ८ .३० या दरम्यान “पसायदान" या विषयावरील चार पुष्प स्वामिनी स्थितप्रज्ञानंद
सरस्वती, फुलगाव, पुणे या गुंफणार आहेत. या सुश्राव्य व्याख्यानमालेचा सर्वांनी आस्वाद घ्यावा असे आवाहन
संस्थेचे प्रधान विश्वस्त श्री. शैलेश गोसावी, अध्यक्ष श्रीमती सुप्रिया पानसे, जेष्ठ विधीज्ञ व विश्वस्त अॅड. एस.एल.
देशपांडे, समन्वयक प्रा. लक्ष्मीकांत जोशी, सचिव श्री. कल्पेश गोसावी यांनी केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी