28 C
Mumbai
Saturday, April 13, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिकच्या धार्मिक नगरिमध्ये येणाऱ्या राजपूत भाविकांसाठी राजपूत भवन अतिशय उपयुक्त - श्री...

नाशिकच्या धार्मिक नगरिमध्ये येणाऱ्या राजपूत भाविकांसाठी राजपूत भवन अतिशय उपयुक्त – श्री श्री १००८ प्रताप पुरी महाराज

नाशिकच्या धार्मिक नगरीमध्ये राजपूत समाज बांधवांसाठी बांधण्यात येत असलेले राजपूत भवन हे राजपूत भाविकांसाठी अतिशय उपयुक्त ठरेल असे प्रतिपादन श्री श्री १००८ प्रताप पुरी महाराज यांनी केले.श्री श्री १००८ प्रताप पुरी महाराज, आमदार राहुल ढिकले यांच्या प्रमुख उपस्थितीत बाफना वेअर हाऊस उपाध्ये कॉलेज परिसर नाशिक येथे राजपूत भवनाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी क्षत्रिय समाज फाऊंडेशनचे अध्यक्ष भगत सिंह राठौड़, उपाध्यक्ष विनोद सिंह शेखावत,अध्यक्ष अरविंद सिंह भाटी, महाराणा एकता मंच मुंबईचे अध्यक्ष सुरेंद्र सिंह भाटी, राजेंद्र सिंह पांचाल यांच्यासह समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

नाशिकच्या धार्मिक नगरीमध्ये राजपूत समाज बांधवांसाठी बांधण्यात येत असलेले राजपूत भवन हे राजपूत भाविकांसाठी अतिशय उपयुक्त ठरेल असे प्रतिपादन श्री श्री १००८ प्रताप पुरी महाराज यांनी केले.श्री श्री १००८ प्रताप पुरी महाराज, आमदार राहुल ढिकले यांच्या प्रमुख उपस्थितीत बाफना वेअर हाऊस उपाध्ये कॉलेज परिसर नाशिक येथे राजपूत भवनाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी क्षत्रिय समाज फाऊंडेशनचे अध्यक्ष भगत सिंह राठौड़, उपाध्यक्ष विनोद सिंह शेखावत,अध्यक्ष अरविंद सिंह भाटी, किशोर सिंह कानोड़, भामाशाह राजस्थान राजपूत परिषदेचे मुख्य रघुनाथ सिंह सुराना, राजस्थान राजपूत परिषदेचे अध्यक्ष महेंद्र सिंह राठौड़, जय नारायण विश्वविद्यालय जोधपुरचे पूर्व छात्र अध्यक्ष कुणाल सिंह भाटी, अध्यक्ष अरविंद सिंह भाटी, महाराणा एकता मंच मुंबईचे अध्यक्ष सुरेंद्र सिंह भाटी, राजेंद्र सिंह पांचाल यांच्यासह समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

यावेळी श्री श्री १००८ प्रताप पुरी महाराज म्हणाले की, क्षत्रिय समाज फाऊंडेशन नाशिकसह परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे. त्यांचं हे कार्य समाजासाठी अतिशय महत्वाचे आहे. हे भवन उभारण्यासाठी पदाधिकारी अतिशय मेहनत घेत असून संस्थेचे या धार्मिक नगरीतील काम अतिशय कौतुकास्पद आहे असे त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार राहुल ढिकले म्हणाले की, राजस्थान राजपूत समाजाच्या उपक्रमात आपला नेहमीच सहभाग असतो. संस्थेच्या वतीने नाशिक शहरात उभारण्यात येत असलेल्या या राजपूत भवनासाठी आपण आवश्यक ती मदत देऊ तसेच समाज बांधवांचे जे प्रश्न असतील ते सोडविण्यासाठी आपण कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन काम करू असे क्षत्रिय समाज फाऊंडेशनचे संस्थापक तेजपाल सिंह सोढा यांनी सांगितले.

सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांवर काम करायला हवं असे महाराणा प्रताप एकता मंच मुंबईचे अध्यक्ष सुरेंद्र सिंह भाटी यांनी सांगितले.

नाशिकमध्ये राजस्थान राजपूत समाजाने केलेल्या कार्यातून राजस्थान मधील राजपूत समाजाला प्रेरणा मिळेल असे जय नारायण विश्वविद्यालयाचे अध्यक्ष अरविंद सिंह भाटी यांनी सांगितले.

राजपूत समाजाच्या कार्यासाठी आपण पुढे राहून काम करू असे माजी अध्यक्ष कुणाल सिंह भाटी यांनी सांगितले.

नाशिकच्या धार्मिक नगरीत आता राजपूत भवन निर्माण होत आहे या कार्यात आपले योगदान राहील असे राजस्थान राजपूत परिषद मुंबईचे अध्यक्ष महेंद्र सिंह यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.

यांनी घेतली प्रत्येकी एक रूम बांधण्याची घेतली जबाबदारी

या प्रसंगी कैप्टन किशोर सिंह राठौड़, क्षत्रिय समाज फाउंडेशनचे उपाध्यक्ष विनोद सिंह शेखावत, वरिष्ठ सल्लागार रंजीत सिंह चुंडावत, दयाल सिंह चौहान, तेजपाल सिंह शेखावत, गोविंद सिंह जादौन, राजस्थान राजपूत परिषद मुंबई यांच्या वतीने प्रत्येकी एक रूम बांधण्याची जबाबदारी घेण्यात आली. या प्रसंगी राजस्थान राजपूत परिषदेचे अध्यक्ष महेंद्र सिंह यांच्यासह सर्व दात्यांचा श्री श्री १००८ प्रताप पुरी महाराज यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी