28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
HomeमनोरंजनEntertainment : “मीदेखील सुशांत सिंहसारखं टोकाचं पाऊल उचलणार होतो, पण…”, विवेक ओबेराॅयने...

Entertainment : “मीदेखील सुशांत सिंहसारखं टोकाचं पाऊल उचलणार होतो, पण…”, विवेक ओबेराॅयने सांगितला आयुष्यातला ‘तो’ किस्सा

अभिनेता सुशांत सिंहची आत्महत्या ही संपूर्ण मनोरंजन क्षेत्राला हादरवून टाकणारी घटना होती. पोलीस प्रशासनाकडून सुशांतची केस बंद झाली असली तरी, सोशल मीडियावर अधून मधून चर्चा होत असते. आज पुन्हा सोशल मीडियावर चर्चा सुरू झालीय, त्याचं कारण म्हणजे अभिनेता विवेक ओबेराॅय. त्या एका मुलाखतीत असं म्हटलंय की, “मीदेखील अडचणीच्या काळात होतो तेव्हा सुशांतसारखं पाऊल उचलणार होतो”, त्याच्या या विधानावरून सोशल मीडियावर नेटकरी चर्चा करताना दिसत आहे. 

हेही वाचा : Ajit Pawar Letter : “…आणि म्हणून मी वेगळी भूमिका घेतली”, अजित पवारांनी जनतेला लिहिलं खुलं पत्र

सुशांतचा स्ट्रगल आणि त्याचं यश यावर ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’शी संवाद साधताना विवेक म्हणाला, “मी सुशांतला भेटलो आहे, त्याच्याशी बऱ्याच गप्पा मारल्या आहेत. तो फारच चांगला, प्रेमळ मुलगा आणि एक उत्कृष्ट कलाकार होता. तो ज्या पद्धतीने आपल्याला सोडून गेलाय तए फारच दुःखद आहे. अगदी खरं सांगायचं झालं तर माझ्याही आयुष्यात एक असा खडतर काळ होता. त्या काळात माझ्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यात बरीच उलथापालथ सुरू होती. सुशांतने जे पाऊल उचललं, मीसुद्धा तेव्हा तसंच काहीसं पाऊल उचलायचा विचार करत होतो.”

विवेक पुढे म्हणाला, “सुशांतच्या अंत्यसंस्कारासाठी फक्त 20 लोक होती. त्यादिवशी भर पावसात मी सुशांतच्या वडिलांच्या डोळ्यातील वेदना, दुःख पाहिल्या अन् त्यावेळी विचार आला की जर सुशांतने ते दृश्य पाहिलं असतं, त्याच्या जवळच्या लोकांची अवस्था पाहिली असती तर त्याने तो निर्णय कधीच घेतला नसता. त्यावेळी एक गोष्ट मला समजली की तुमच्या जवळच्या लोकांना ज्यांच्यावर तुम्ही जिवापाड प्रेम करता त्यांची अशाप्रसंगी काय अवस्था होईल, त्यांना किती दुःख होईल, यातना होतील? याचा विचार आपण करायला हवा.”

हेही वाचा : “जरांगे-पाटलांचा कालचं सगळं नाटक आणि तमाशा होता”, अजय बारसकरांचा हल्लाबोल

“मी स्वतःला खूप नशीबवान समजतो माझ्याकडे एक असं घर आहे, एक कुटुंब आहे जे आम्हाला एकत्र बांधून ठेवतं. त्यावेळी मी एका लहान मुलासारखा खाली जमिनीवर बसलो, माझ्या आईच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि अक्षरशः खूप रडलो आणि मोकळा झालो”, अशा भावना विवेक व्यक्त केल्या. त्या अडचणीच्या काळातून विवेक बाहेर पडला. ‘इनसाइड एज’, ‘धारावी बँक’सारख्या वेबसीरिजमधून विवेकने ओटीटीमध्ये पदार्पण केलं. नुकताच विवेक रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पोलिस फोर्स’ या सीरिजमध्येही काम केलं आहे.

हेही वाचा : नाशिकच्या धार्मिक नगरिमध्ये येणाऱ्या राजपूत भाविकांसाठी राजपूत भवन अतिशय उपयुक्त – श्री श्री १००८ प्रताप पुरी महाराज

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी