33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक नगरीचा श्रीराम जन्मोत्सवासाठी रामभूमी सज्ज

नाशिक नगरीचा श्रीराम जन्मोत्सवासाठी रामभूमी सज्ज

प्रभू श्रीराम चंद्राच्या पदस्पर्शाने पावन नाशिक नगरीचा संपूर्ण देशभरात नावलौकिक आहे. श्री राम नवमीनिमित्त बुधवारी (ता.१७) श्रीरामाचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी ही रामभूमी सज्ज झाली आहे. शहरातील प्रमुख मंदिरांमध्ये तसेच संस्थांतर्फे विविध भजन, कीर्तन अशा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे नाशिककर रामनामाच्या गजरात न्हाऊन निघणार आहेत. श्री काळाराम मंदिर शहराचे वैभव अन् ऐतिहासिक वारसा असलेल्या काळाराम मंदिरात श्रीराम जन्माचा उत्सव मोठ्या उत्साहात अन् चैतन्यमयी वातावरणात सुरु आहे. बुधवारी (ता.१७) राम नवमीनिमित्त मंदिरात पहाटे पाचला काकडा आरती तसेच सकाळी ९ ते ११.३० दरम्यान भजन, कीर्तनाचे कार्यक्रम होणार आहेत. तर दुपारी १२ ला राम जन्माची महाआरती होणार आहे.

प्रभू श्रीराम चंद्राच्या पदस्पर्शाने पावन नाशिक नगरीचा संपूर्ण देशभरात नावलौकिक आहे. श्री राम नवमीनिमित्त बुधवारी (ता.१७) श्रीरामाचा जन्मोत्सव ( Shri Ram’s birth anniversary) साजरा करण्यासाठी ही रामभूमी ( Rambhoomi ) सज्ज झाली आहे. शहरातील प्रमुख मंदिरांमध्ये तसेच संस्थांतर्फे विविध भजन, कीर्तन अशा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे नाशिककर रामनामाच्या गजरात न्हाऊन निघणार आहेत. श्री काळाराम मंदिर शहराचे वैभव अन् ऐतिहासिक वारसा असलेल्या काळाराम मंदिरात श्रीराम जन्माचा उत्सव मोठ्या उत्साहात अन् चैतन्यमयी वातावरणात सुरु आहे. बुधवारी (ता.१७) राम नवमीनिमित्त मंदिरात पहाटे पाचला काकडा आरती तसेच सकाळी ९ ते ११.३० दरम्यान भजन, कीर्तनाचे कार्यक्रम होणार आहेत. तर दुपारी १२ ला राम जन्माची महाआरती होणार आहे.(Rambhoomi ready for Shri Ram’s birth anniversary in Nashik city)

श्री गोराराम मंदिर
शहरातील पेशवेकालीन गोराराम मंदिरात रामजन्मोत्सव साजरा करण्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. राम जन्मोत्सवानिमित्त सकाळी १० ते १२ वाजेदरम्यान प्रसाद जोशी यांचे कीर्तन होणार आहे. भाविकांनी राम जन्मोत्सव, आरतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री गोराराम मंदिराचे विश्वस्त व पुजारी हेमंत पद्मनाभी यांनी केले आहे.

श्रीरामाचे ४० फुटी चित्र
अशोक स्तंभ मित्र मंडळातर्फे रामनवमी निमित्त प्रभू श्रीरामाचे ४० फूट नियॉन पेंटींग साकारले आहे. शहरातील मध्यवर्ती अशा अशोक स्तंभ चौकात नाशिककरांनी या अद्भुत श्रीराम चित्राला याची देही याची डोळा पाहण्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

विघ्नहरण गणेश मंदिरात कार्यक्रम
डीजीपी नगर १ मधील श्री विघ्नहरण गणेश देवस्थान ट्रस्टतर्फे मंदिराच्या प्रांगणात राम जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी दहाला प्रभू रामचंद्र भजन व गीत कार्यक्रम होणार आहे. ११.४५ ला सामूहिक रामरक्षा पठण, दुपारी बाराला रामजन्मोत्सव व महाआरती होणार आहे. साडेबारानंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करणार आहे.

श्रीरामनगरात रामजन्मोत्सव
सीता वल्लभ बहुउद्देशीय संस्था, श्रीरामनगरतर्फे श्रीराम पालखी मिरवणूक, श्रीराम पूजन व भजन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी साडेआठला श्रीराम पूजन त्यानंतर साडेनऊ ते साडेअकरापर्यंत भजन, कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी बाराला श्रीराम जन्म व महाआरती होणार असून त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले जाईल. संस्थेतर्फे सायंकाळी भजन व अभंगवाणी या संगीत कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.संस्थेतर्फे सायंकाळी भजन व अभंगवाणी या संगीत कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी