33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयमाढ्यातील राजकीय घडामोडींना वेग, फडणवीसांच्या भेटीनंतर जानकर पवारांच्या भेटीला; काय झाली चर्चा?

माढ्यातील राजकीय घडामोडींना वेग, फडणवीसांच्या भेटीनंतर जानकर पवारांच्या भेटीला; काय झाली चर्चा?

माढा मतदार (madha lok sabha) संघातील राजकीय वारे क्षणा क्षणाला बदलताना दिसत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळासह नागरिकांध्ये माढ्यात नेमकं घडतयं तरी काय? असा सवाल उपस्थित होत आहे. याचे कारणही तसेच आहे. अजित पवार गटाचे नेते उत्तम जानकर (uttam jankar) फडणवीसांच्या भेटीनंतर शरद पवारांच्या भेटीला पोहचले आहेत. त्यांच्या या भेटीगाठीमुळं कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं उत्तम जानकर मोठा निर्णय घेण्याची शक्यता राजकीय वर्तुळात रंगली आहे. उत्तम जानकर 19 एप्रिलला त्यांची भूमिका जाहीर करणार असल्याची माहिती समोर आली आहे.(madha lok sabha uttam jankar meet sharad pawar)

अकलूजमधील कट्टर विरोधक मोहिते-पाटील यांच्याशी जानकर हातमिळवणी करणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्याच पार्श्वभूमीवर उत्तम जानकर यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची चर्चा रंगली आहे. यावेळी माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील ( Dhairyasheel Mohite Patil ) सुद्धा उपस्थित होते.

नागपूर येथे खास विमानाने जावून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका ऐकल्यावर उत्तम जानकर आता शरद पवार यांच्या भेटीला आले आहेत. माध्यामांशी संवाद साधताना जानकर यांनी देवेंद्र फडणवीस यांची बाजू ऐकून घेतली असून आता शरद पवार यांची बाजू जाणून घेणार असल्याचे म्हटले होते.

राम नवमीदिवशी राज ठाकरेंची खास पोस्ट, श्रीरामाचं अस्तित्व नाकारणाऱ्या पक्षांवार डागली तोफ

उत्तम जानकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर प्रमुख कार्यकर्त्यांसह वेळापूर येथे बैठक घेतली होती. देवेंद्र फडणवीस यांनी खास विमान पाठवून नागपूर येथे चर्चा केली होती. त्या बैठकीनंतर जानकर यांनी आमदारकीचे आश्वासन दिले असल्याचं सांगितलं होतं. विधान परिषद किंवा विधानसभा, आता रान मोकळे तुम्ही मागाल ते देऊ असं आश्वास देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं उत्तम जानकर यांनी सांगितलं होतं.

दरम्यान, उत्तम जानकर आज शरद पवारांची भेट घेऊन त्यांची बाजू जाणून घेऊन 19 एप्रिलला आपली राजकीय भूमिका ठरवणार आहेत. जानकर यांच्या निर्णयाचा माढा लोकसभेच्या निर्णयावर परिणाम दिसू शकतो.

जानकर पवार भेटीत काय झाली चर्चा

पवारांच्या भेटीनंतर जानकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. मोहिते-पाटील आणि आमच्यातील वैर संपून निवडणुकीत एकत्र यावं, असं शरद पवारांचं मत होतं. पण, आम्ही एकमेकांविरोधात लढलो असल्यानं अनेक अडचणी आहेत. त्या अडचणी सोडण्याबाबत एक बैठक झाली आहे. दोन-तीन दिवसांत दुसरी बैठक होणार आहे.एकमेकांना सहकार्य होऊ शकते का? मोहिते-पाटील आणि आमच्यातील वैर कसं थांबणार आणि काही कामांबद्दल बैठकीत चर्चा झाली,” अशी माहिती जानकरांनी दिली.

“शरद पवारांबरोबर जावं, अशी आमच्या गटातील कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मोहिते-पाटील आणि आम्ही एकत्र आलो, तर विधानसभेला मी उमेदवार असू शकतो,” असे सूचक संकेत उत्तम जानकरांनी दिले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी