संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक लोक ठाकरे गटात प्रवेश करत आहे. कारण त्यांना माहित आहे मविआ सरकार येणार आहे. राज्यातील परिस्थिती बिघडली.मिध्ये सरकारने एक पण आश्वासन पूर्ण केले नाही.इकडे फक्त पक्ष फोडा घर फोडा एवढंच उद्योग चालविला आहे.महाराष्ट्रातील सरकार दिल्लीपुढे लोटांगण घालणारे असल्याची सडकून टीका करत उध्दव ठाकरे यांच्या सरकारची राज्याला गरज असल्याचे शिवसेना ठाकरे गट युवा नेते आदित्य ठाकरे यांनी सांगितले.नाशिक दौर्यात आदित्य ठाकरे यांनी बुधवारी जेलरोड येथील सभेत भाजपसह शिंदेवर तोफ धाडली. देशासह राज्यात संवाद नाही तर वाद सुरू आहे.धर्मा धर्मात, जाती जातीत भांडणे लावण्याचे काम भाजप राज्य करत आहे. गेल्या महिन्यात लडाख मधील भूमिपुत्रांनी आंदोलन छेडले आहे. आम्हाला केंद्रशासित राहायचे नाही असं त्यांचे म्हणणे आहे कारण दिल्ली पर्यंत त्यांचा आवाज जात नाही.
दिल्लीतील वातावरण खराब झाले आहे बॉर्डर सिल करून ठेवल्या आहे. दिल्लीत जणू युद्ध सुरू आहे.शेतकरी मोर्चा दिल्लीकडे घेऊन निघाला आहे.
आश्वासन पूर्ण झाले नाही म्हणून ते बाहेर निघाले.पण अपेक्षा सरकारं पूर्ण करू शकत नाही. ड्रोन माध्यमातून अश्रुधुर सोडले जात असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. शेतकऱ्यांना भेटून चर्चा करावी आणि मध्यम मार्ग काढावा. गोळीबार करून अश्रुधुर सोडून त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे त्यांनी सांगितले.
सगळीकडे अस्थिरता निर्माण केला आहे. राज्यातील प्रकल्प बाहेर गेला त्या पेक्षा मोठा प्रकल्प देण्यात येणार होता तो का देण्यात आला नाही असा सवाल त्यांनी विचारला.आम्ही शेतकऱ्यांना कर्ज मुक्त केल. त्याचा आम्हाला अभिमान आहे.
कोविडच्या काळात अर्थचक्र पूर्ण बंद असताना देखील आपण अनेकांना मदत केली. शेतकरी बांधवांना जे आश्वासन दिले ते पूर्ण केले.या घटनाबाह्य सरकार काळात एक तरी उद्योजक महाराष्ट्रात आणला का ?
सगळे इंजिन फेल झाले. डबल पण नाही आणि त्रिपल सरकार फेल गेले. वेदांता फॉक्स्कों कंपनी आणण्यासाठी मी प्रयत्न केले ती गेली याचे मला फार वाईट वाटले.
राष्ट्रवादी मधून फोडलेले मंत्री केले. आमचे फोडले त्यातून मंत्री केले तुमचे आहे कुठे? मग भाजप ला मिळाले काय? भ्रष्टाचार मुक्त देश करणार, काँग्रेस मुक्त देश करणार होता आणि त्यांनाच राज्यसभा उमेदवारी देतात
भाजपच्या कार्यकर्त्यांनी बद्दल सहनभुती वाटते तुमचे काय ?.भाजपची टॅग लाईन बदलली आहे जो जास्त भ्रष्टाचार करेल त्याला आमदार मंत्री करू असा टोला त्यांनी लगावला.
नाशिक उध्दव ठाकरे यांच्या सरकारची राज्याला गरज:आदित्य ठाकरे
संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक लोक ठाकरे गटात प्रवेश करत आहे. कारण त्यांना माहित आहे मविआ सरकार येणार आहे. राज्यातील परिस्थिती बिघडली.मिध्ये सरकारने एक पण आश्वासन पूर्ण केले नाही.इकडे फक्त पक्ष फोडा घर फोडा एवढंच उद्योग चालविला आहे.महाराष्ट्रातील सरकार दिल्लीपुढे लोटांगण घालणारे असल्याची सडकून टीका करत उध्दव ठाकरे यांच्या सरकारची राज्याला गरज असल्याचे शिवसेना ठाकरे गट युवा नेते आदित्य ठाकरे यांनी सांगितले.नाशिक दौर्यात आदित्य ठाकरे यांनी बुधवारी जेलरोड येथील सभेत भाजपसह शिंदेवर तोफ धाडली. देशासह राज्यात संवाद नाही तर वाद सुरू आहे.