28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक शहरातील अपघात रोखण्यासाठी 333 ठिकाणी गतिरोधक बसविण्याचे काम सुरु

नाशिक शहरातील अपघात रोखण्यासाठी 333 ठिकाणी गतिरोधक बसविण्याचे काम सुरु

नाशिक महानगरपालिकेने शहरातील अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना म्हणून 333 ठिकाणी गतिरोधक बसवले जाणार आहे. गतीरोधक बसवण्याचे काम सुरु करण्यात आले असून प्रमुख चौक, शाळा, सरकारी कार्यालय, धार्मिक स्थळे, गर्दीची ठिकाणावर गतिरोधक बसविले जाणार आहेत. सोबतच रस्ते सुरक्षेच्या दुष्टीने रस्त्यांवर झेब्रा क्रॉसिंग, स्पीड टेबल, थर्मो प्लास्टिक पेंटने पट्टे मारणे बसविणे रोड मार्ग सूचनाफलक नो- पार्किंग फलक लावले जाणार आहेत.रस्ता सुरक्षा समितीची उपसमिती गठीत करुन शहरात कुठे गतिरोधक बसविणे आवश्यक आहे. याकरिता गेल्या वर्षी सर्वेक्षण करण्यात आले. या उपसमितीमध्ये महापालिकेचे उपअभियंता, प्रादेशिक परिवहन अधिकारी, शहर वाहतूक शाखेचे अधिकारी यांचा समावेश आहे.

नाशिक महानगरपालिकेने शहरातील अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना म्हणून 333 ठिकाणी गतिरोधक बसवले जाणार आहे. गतीरोधक बसवण्याचे काम सुरु करण्यात आले असून प्रमुख चौक, शाळा, सरकारी कार्यालय, धार्मिक स्थळे, गर्दीची ठिकाणावर गतिरोधक बसविले जाणार आहेत. सोबतच रस्ते सुरक्षेच्या दुष्टीने रस्त्यांवर झेब्रा क्रॉसिंग, स्पीड टेबल, थर्मो प्लास्टिक पेंटने पट्टे मारणे बसविणे रोड मार्ग सूचनाफलक नो- पार्किंग फलक लावले जाणार आहेत.रस्ता सुरक्षा समितीची उपसमिती गठीत करुन शहरात कुठे गतिरोधक बसविणे आवश्यक आहे. याकरिता गेल्या वर्षी सर्वेक्षण करण्यात आले. या उपसमितीमध्ये महापालिकेचे उपअभियंता, प्रादेशिक परिवहन अधिकारी, शहर वाहतूक शाखेचे अधिकारी यांचा समावेश आहे.उपसमितीने 333 ठिकाणी गतिरोधक बसवून याबरोबरच उपाययोजना करण्याची शिफारस केली. त्याअनुषंगाने निविदा काढून मक्तेदार नियुक्त करण्यात आला आहे.पावसाळ्यापूर्वी 333 किलोमीटर गतिरोधक बसविण्याची नियोजन आहे.बांधकाम विभागानेनुकतीच मक्तेदारांसोबत चर्चा केली. त्यात शहरातील सहा विभागात फेब्रुवारीअखेर किमान 50 गतिरोधक बसविण्याच्या सूचना दिल्या, तर एप्रिलअखेर 333 ठिकाणी गतिरोधक बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. शहरात गेल्या दहा वर्षात मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे झाले. अगदी कॉलनी रस्तेदेखील मोठ्या प्रमाणात रुंदीकरण करण्यात आले आहे. परिणामी भरधाव वाहने चालविण्याचे प्रमाणदेखील वाढले. अपघातावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक ठिकाणी सिग्नल बसविण्यात आले असले तरी दुसरीकडे मात्र गतिरोधक बसविण्यावरून दुमत आहे. गतिरोधक बसवण्यासाठी समितीकडे प्रस्ताव पाठवावा लागतो. मात्र ऑक्टोबर 2022 मध्ये छत्रपती संभाजीनगर महामार्गावर मिरची चौकात बस दुर्घटना झाली. त्यात आगीत होरपळून 13 प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यानंतर रस्ता वाहतूक समितीने गतिरोधक बसवण्याची मागणी करण्यात आली होती.

विभागात बसवले जाणारे गतीरोधक संख्या

पूर्व विभागात 68
पश्चिम विभागात 36
पंचवटी 89
नाशिकरोड 48
सिडको 60
सातपूर 32

रस्ता सुरक्षा उपसमितीने सर्वेक्षण केले असता 333 ठिकाणी गतिरोधक बसविली जाणार आहे. कार्यरंभ आदेश निघणार असून तात्काळ कामे सुरु केले जाणार आहे.
-शिवकुमार वंजारी, शहर अभियंता, मनपा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी