28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक दिशादर्शक कमानींचे स्ट्रक्चरल ऑडिट रखडले जिवीतहानी झाल्यास जबाबदारी कोण...

नाशिक दिशादर्शक कमानींचे स्ट्रक्चरल ऑडिट रखडले जिवीतहानी झाल्यास जबाबदारी कोण घेणार !

शहरातील दोनशेहून अधिक दिशादर्शक कमानी मजबुती करणाचे स्ट्रक्चरल ऑडिट रखडले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन दिशादर्शक कमान कोसळून जिवीतहानी होण्याची वाट पहात आहे का ? असा संतप्त सवाल नाशिककरांकडून केला जातो आहे. दरम्यान दिशादर्शक फलकांचे स्ट्रक्चरल ऑडीट खोळ्ंबण्याचे कारण काय ? ऑडीटची फाइल कोणी थांबवून ठेवली ? असे विविध प्रश्न उपस्थित झाले आहे. पुणे व इतर काही मेट्रो शहरांमध्ये या दिशादर्शक कमानी कोसळून अपघात झाले आहेत. त्यामध्ये काहीजणांना जीवही गमवावा लागला. अशी दुर्घटना नाशिकमध्येही घडू शकते. शहरात महत्वाच्या व नेहमी वर्दळ असलेल्या रस्त्यांवर मोठ मोठे लोखंडी साचा असलेल्या कमानी उभ्या आहेत.

रस्त्याच्या दुतर्फा व दुभाजकांमध्ये छोटे दिशादर्शक कमानी आहेत.हा धोका ओळखून महापालिका बांधकाम विभाग शहरातील दिशादर्शक कमानींचे सुरक्षा ऑडिट केले जाणार आहे. त्यासाठी शासन मान्यता प्राप्त सिव्हिल टेक, मविप्रचे स्व.बाबुराव ठाकरे व संदिप फाऊंडेशन यांच्याशी ऑडिटचे दर मागवले असता संदीप फाउंडेशन वगळाता दोन्ही सस्थेनी बांधकाम कडे दर पाठविले आहेत. नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात निविदा खुली केली जाणार होती. मात्र या निविदेला मुहूर्ता लागलेला नाही. शहरात पालिका विविध विकास कामांवर कोट्यावधींची उधळ्पट्टी करत आहे. परंतु नागरिकांच्या जिवाला धोका पोचवू शकणाऱ्या शहरातील विविध ठिकानच्या दिशा दर्शक फलकांचे स्ट्रक्चर ऑडीत होत नसल्याचे चित्र आहे. स्ट्रक्चर ऑडीटसाठी पालिकेकडे सिव्हिल टेक, मविप्रचे स्व.बाबुराव ठाकरे या संस्थानी अर्ज केले आहेत. शहरात छोट्या मोठ्या दिशादर्शक कमानींची संख्या दोनशेहून अधिक आहे. या कमानींच्या मजबुतीचे आतापर्यंत एकदाही स्ट्रक्चरल ऑडिट झाले नाही. ज्या सस्थेला काम मिळेल, त्याना ऑडिटसाठी तीन महिन्यांची मुदत दिली जाणार आहे. संबंधित संस्था बारकाईने कमानीचे स्ट्रक्चर किती सुरक्षित आहे, किती धोकादायक आहेत. याचा अहवाल तयार करणार आहेत. परंतु दिशा दर्शक स्ट्रक्चर ऑडीटची फाइल पुढे जात नसल्याने बांधकाम विभागात धूळ खात पडली आहे.

शहरात दोनशे दिशा दर्शक कमाई

मागील दोन कुंभमेळ्यामुळे शहरात अंतर्गत रिंगरोडचे जाळे विस्तारले आहे. नववसाहतीही वाढत आहे. शहरातील नागरिकांसह बाहेरुन येणारी वाहने, पर्यटक यांच्यासाठी दिशादर्शक कमानी मार्गदर्शकाचे काम करतात. मात्र या कमानी मजबूत आहेत कां नाही हे तपासणे महत्वाचे आहे. त्यामुळे या स्ट्रॅक्चर ऑडिट मधून किती ठिकानच्या दिशा दर्शक कामानी मजबूत आहेत, किंवा कमकुवत आहेत. ही माहिती मिळ्णार आहे. शहराचा विकास चौफेर होत असून शहराची हद्द वीस किलोमीटरपर्यंत विस्तारली आहे. .

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी