33 C
Mumbai
Monday, April 22, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक श्री गजानन महाराज सेवा संस्थेच्या वतीने श्रीगजानन महाराजांचा प्रगटदिन संपन्न

नाशिक श्री गजानन महाराज सेवा संस्थेच्या वतीने श्रीगजानन महाराजांचा प्रगटदिन संपन्न

श्री संत गजानन महाराज यांचा १४६ वा प्रगट दिन उत्सव दक्षिणवाहिनी गोदावरी मातेच्या तीरावरील श्री यशवंतराव महाराज पटांगणावर रविवार (दि ३) रोजी संपन्न झाला. यावेळी सकाळी ८ वा. श्रींच्या रजतमुखवट्याचे पूजन मान्यवरांच्या हस्ते होऊन श्रींची पालखी रविवार कारंजा, मेन रोड, गाडगे महाराज पुतळा,साक्षी गणपती, तिवंदा चौक,सोमवार पेठ मार्गे यशवंतराव महाराज पटांगण येथे आली. श्रींच्या पालखी सोहळ्यासाठी आधारतीर्थ येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं-मुली, तुकाराम महाराज अध्यात्मिक केंद्र पांढर्ली व गुरुदेव ज्ञानपीठ वडांगळी येथील लहान मुले मुली या उत्सवात ज्ञानोबा तुकाराम, माऊली हळूहळू चला मुखाने गजानन बोला, गण गण गणात बोते या गजरात, टाळ मृदुंगाच्या तालावर नृत्य करत लहान व मोठे वारकरी सहभागी झाले होते.

तसेच रांगोळी, फुलांच्या पाकळ्या टाकत पारंपारिक वेशेतील महिला भक्त यांचादेखील मोठ्या प्रमाणात समावेश होता.
सेवेकरी राजेंद्र सोसे व सौरभ गवांदे यांच्या हस्ते श्रींना महाअभिषेक घालून महाआरती करण्यात आली. त्यानंतर दु. १ वाजेनंतर सायंकाळी उशिरापर्यंत महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी दु. १.३० वा कर्नाटकी समाज महिला मंडळ व दुर्गा देवी भजनी मंडळ यांनी भजन सादर केले. या सोहळ्यात मोठ्या प्रमाणावर भक्त सहभागी झाले होते.

तारवाला नगर अमृतधाम लिंक रोडवरील संभाजी महाराज चौकातील श्री संत गजानन सेवा भावी संस्थेच्यावतीने गजानन महाराज प्रगटदिनानिमित्त दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक जगदीश पाटील यांनी सांगितले.
तारवाला नगर अमृतधाम लिंक रोड येथे माजी नगरसेवक जगदीश पाटील यांच्या पुढाकाराने गेल्या वर्षी श्री गजानन महाराज मंदिर उभारण्यात आले. शनिवार (दि.२) रोजी प्रगटदिन व मंदिराचा प्रथम वर्धापनदिनानिमित्त संस्थेच्या माध्यमातून मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करत विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यावेळी श्रींचा पालखी सोहळा गुंजाळमळा, मंडलिकमळा, सावता नगर, वृंदावन नगर, ठाकरे मळा, उमा नगर, मारूती मंदिर मार्गे संभाजी महाराज चौकातून मंदिर परिसरापर्यंत काढत संपन्न झाला. दरम्यान रविवार (दि.३) रोजी प्रगटदिना निमित्त सकाळी ८:३० वाजता अभिषेक, होमहवन करण्यात आले या होमहवन करिता परिसरातील जोडप्यांनी सहभाग नोंदवला होता, तर सकाळी ११ वाजता श्रींची महाआरती संपन्न झाली असून दुपारी १२ ते ४ वेळेत महाप्रसाद वाटप करण्यात आला. या सर्व कार्यक्रमांना परिसरातील श्री भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
यावेळी लक्ष्मण फिरके, राजेश कुमार पटेल, संदीप कळसकर, डॉ.प्रशांत भदाणे, नितीन पाटील, शरद गुंजाळ, भानुदास मंडलिक, ॲड. वसंत गडकरी, सतिष माशाळकर, कुमुदिनी महाले, गुलाबराव माळी, चंद्रकांत काळे, रविंद्र कुमावत उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी